Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Maratha Reservation : अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर धाराशिवमध्येही आंदोलकांनी वेगळ्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 09:03 PM
Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

Follow Us
Follow Us:
  • टेभुर्णीत जयकुमार गोरे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांचे आंदोलन
  • अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस
  • शहाजी बापू पाटील यांनी भेट घेतली; प्रकृती पाहून झाले भावूक
 

Maratha Reservation : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण चौथ्या दिवशीही कायम आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहेत. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातही आंदोलकांनी वेगवेगळ्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेभुर्णी येथे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ताफ्यासमोर काही मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. चार ते पाच आंदोलकांनी गाडीसमोर येत ‘एक मराठा, लाख मराठा’ तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी वाहनासमोर आडवे होऊन ताफा रोखण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली.

जयकुमार गोरे हे माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. ताफ्यात माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केले. त्यानंतर पालकमंत्र्यांचा ताफा पुढे रवाना झाला.

OBC Bachao Morcha: मुंबईकडे जाणारा ‘ओबीसी बचाव मोर्चा’ पोलिसांनी रोखला; लक्ष्मण हाकेंचा ३ तास ठिय्या!

पोलीस अधिकाऱ्यांशी जयकुमार गोरे यांची चर्चा

ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जयकुमार गोरे कार्यक्रमस्थळी पोहोचले. तेथे त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, धाराशिवमध्येही मराठा आंदोलकांनी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. सामाजिक न्याय विभागाच्या उंच इमारतीवर चढून काही आंदोलकांनी आपली भूमिका मांडल्याने तेथील परिस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

शहाजी बापू पाटील जरांगेंच्या भेटीला

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून ते भावूक झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची परिस्थिती आणि राज्यभरातून वाढत असलेला मराठा समाजाचा पाठिंबा पाहता, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title: Maratha reservation protesters attempt to stop jaykumar gore convoy solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
1

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
2

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
3

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
4

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.