Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार-उदय सामंत यांच्यात भेट; भेटीवर मंत्री सामंत म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2025 | 01:52 PM
शरद पवार-उदय सामंत यांच्यात भेट; भेटीवर मंत्री सामंत म्हणाले...

शरद पवार-उदय सामंत यांच्यात भेट; भेटीवर मंत्री सामंत म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर त्यांनी भाष्य केले. उदय सामंत यांनी या भेटीमागील कारणही सांगितलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सामंत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘अखिल भारतीय नाट्य परिषद ही संस्था आहे. त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत. शरद पवार विश्वस्त मंडळात आहे. त्यानुसार, त्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मी विश्वस्त म्हणून उपस्थित होतो. धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरले आहे. आता पुढील विश्वस्त आणि नियामक मंडळाची बैठक 11 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. मी या प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे मला यावेळी बोलवण्यात आले होते.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही. बॅलेटवर मतदान घेऊनही मतदारांनी यूबीटीला नाकारलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी तीन कारणं दिली गेली. आता कुठलेतरी कारण शोधायचं, स्वत:चा पराभव दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून त्यांनी ईव्हीएमवर फोडले आहे, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

जर खासदार राहुल गांधींना निवडणूक आयोगाने केलेल्या मतचोरीविरोधात यात्रा काढावी लागली, तर महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंध्ये गट, भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. जोपर्यंत या देशात मोदी, शहां सारखे लोक सत्तेवर आहेत, तोपर्यंत या देशात निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पैशांचा प्रचंड वापर

तसेच, मुंबई महानगरपालिका असो विधानसभा किंवा लोकसभा असो कारण इतकेच सांगेल की, पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातील, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

Web Title: Meeting between sharad pawar and uday samant in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • political news
  • Sharad Pawar
  • Uday Samant

संबंधित बातम्या

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज  शौचालय अन् फ्रेश होण्याची
1

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज शौचालय अन् फ्रेश होण्याची

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र
2

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

बिहारमध्ये जाळ अन् धूर संगटच! निवडणुकांचा बिगुल वाजताच उडाला राजकीय समीकरणांचा धुराळा
3

बिहारमध्ये जाळ अन् धूर संगटच! निवडणुकांचा बिगुल वाजताच उडाला राजकीय समीकरणांचा धुराळा

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
4

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.