Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधकांच्या टीकेनंतर सोडले मौन; अशोक खरात प्रकरणावर अखेर मंत्री आदिती तटकरेंची प्रतिक्रिया

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2026 | 03:27 PM
Minister for Women and Child Welfare, Aditi Tatkare reaction to the Ashok Kharat case.

Minister for Women and Child Welfare, Aditi Tatkare reaction to the Ashok Kharat case.

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरात प्रकरणावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया
  • विरोधकांच्या जोरदार टीकेनंतर दिली प्रतिक्रिया
  • सोशल मीडिया आदिती तटकरेंची पोस्ट
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये सध्या अशोक खरात प्रकरणामुळे (Ashok Kharat Case) मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिकच्या या भोंदूबाबाने शेकडो महिलांचे शोषण केले असून अत्याचार केले आहेत. यामुळे त्याची एसआयटी चौकशी सुरु असून त्याची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. या अशोक खरातला गुरु मानल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचे स्पष्ट करत त्यांचा व्हिडिओ शेअर केला.

महाराष्ट्रामधील सर्वात मोठे लैंगिक अत्याचार प्रकरण आणि अंधश्रद्धेचे जाळे समोर आले. मात्र यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. महिलांसंबंधित मोठे प्रकरण समोर आल्यानंतर देखील कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे विरोधकांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागले, भूमिका न घेणे हे संशयास्पद असल्याचे देखील महाविकास आघाडीचे नेते म्हणू लागले. यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगितले आहे.

हे देखील वाचा : “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या

काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचा 20 मार्च रोजी प्रतिक्रिया दिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. याचबरोबर लिहिले आहे की, “नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या आहेत. या प्रतिक्रियांच्या लिंक्स मी खाली जोडत आहे”

नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्परतेने SIT स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलीस… pic.twitter.com/XXIUfx8bmb — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 31, 2026

हे देखील वाचा : “हमाम में सब नंगे” प्रमाणे सगळेच उघडे पडले…; अशोक खरात प्रकरणावर खासदार राऊतांची टीका

पुढे आदिती तटकरे यांनी लिहिले आहे की, महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या आमच्या भूमिकेचा मी पुनरुच्चार करते, असे मत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Minister for women and child welfare aditi tatkare reaction to the ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Ashok Kharat
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.