Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप

शहरात नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 03:10 PM
“जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप
Follow Us
Follow Us:
  • “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा”
  • लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप
मिरा-भाईंदर/ विजय काते : शहरात नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या लोकदरबाराला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकत होते. शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित राहिले होते.

या लोकदरबारात पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, तसेच एमएमआरडीए (MMRDA) अंतर्गत येणाऱ्या विकासकामांबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. विशेषतः मेट्रो, रस्ते विकास, तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये “झोम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मात्र, या सर्व तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी उपस्थित राहणे अपेक्षित असलेले MMRDA चे संबंधित अधिकारी लोकदरबारात अनुपस्थित असल्याचे समोर आले. यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांचा संताप अनावर झाला.
एका नागरिकाने एमएमआरडीए संदर्भातील गंभीर तक्रार मांडताच सरनाईक यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. फोनवरून त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत अत्यंत कडक शब्दांत सुनावले . “तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी आहे का? लोकांची कामं प्रलंबित आहेत आणि तुम्ही लोकदरबारातही हजर राहत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”

सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना तात्काळ लोकदरबाराच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही वेळातच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी हजर राहण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.लोकदरबारादरम्यान मंत्री सरनाईक यांनी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनाही स्पष्ट सूचना दिल्या की, नागरिकांच्या समस्या सोडवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक तक्रारीवर वेळेत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कडक भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले. दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरातील प्रलंबित विकासकामे, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि एमएमआरडीएशी संबंधित प्रकल्पांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील काळात अधिकारी वर्ग अधिक सजगपणे काम करेल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Matheran leopard : माथेरान घाटात प्रवासादरम्यान बिबट्याचे दर्शन; टॅक्सी चालकाने व्हिडिओ शूट, वन विभाग सतर्क

Web Title: Mira bhayander minister pratap sarnaiks anger at mmrda officials in lok darbar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • MMRDA
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.