Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदार ओळखपत्र खरंच रद्द होणार का? निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

भारत निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी असा कोणताही संदेश अथवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी केलेला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2026 | 02:27 PM
मतदार ओळखपत्र खरंच रद्द होणार का? निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

मतदार ओळखपत्र खरंच रद्द होणार का? निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण खुलासा

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026’ दरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने मतदार ओळखपत्र रद्द होणार असल्याचा दावा करणारा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा संदेश पूर्णपणे खोटा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेल्या या संदेशात मतदारांच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तातडीने संपर्क न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाईल आणि मतदार ओळखपत्र रद्द होईल, असे सांगण्यात आले आहे. या संदेशासोबत भारतीय निवडणूक आयोगाचा लोगो आणि मोबाईल क्रमांक देण्यात आल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने फेटाळला दावा

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या व्हायरल संदेशाची दखल घेत स्पष्टीकरण दिले आहे. अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, भारत निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी असा कोणताही संदेश अथवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी केलेला नाही.

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; दोन्ही दिशेची वाहतूक तातडीने बंद

संशयास्पद संदेशाला प्रतिसाद देऊ नये

निवडणूक आयोग मतदारांना वैयक्तिक संदेश पाठवून कागदपत्रांची मागणी करत नाही किंवा मतदार ओळखपत्र रद्द करण्याची धमकी देत नाही. व्हायरल संदेशातील भाषा आणि अधिकाऱ्यांचा उल्लेख हा अधिकृत प्रक्रियेशी सुसंगत नसल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. हा संदेश सायबर फसवणुकीचा भाग असण्याची शक्यता असून, नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद संदेशाला प्रतिसाद देऊ नये. तसेच आपली वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रांची माहिती अनोळखी क्रमांकावर शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाटण मतदारसंघात ‘एसआयआर’ (SIR) मोहीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे. महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ketan Agarwal Murder Case : ‘…बेटा, तुला न्याय मिळाला…!,’ केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधानांकडे कठोर शिक्षेची मागणी

Web Title: May voter id cards really be cancelled election commission makes a crucial clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • political news
  • SIR
  • voting news

संबंधित बातम्या

Raghav Chadha: राघव चड्ढा यांची खासदारकी जाणार? SIR च्या ड्राफ्ट लिस्टमधून नाव गायब, 2003 मध्ये बदलला होता नियम
1

Raghav Chadha: राघव चड्ढा यांची खासदारकी जाणार? SIR च्या ड्राफ्ट लिस्टमधून नाव गायब, 2003 मध्ये बदलला होता नियम

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
2

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…
3

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
4

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.