Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाला आमदार सतेज पाटलांचा विरोध; सुचवला वेगळाच पर्याय

शक्तीपीठ महामार्ग हा चर्चेमध्ये राहिला आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला आहे. आता यावर कॉंग्रेस नेते सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया देत उपाय सांगितला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 07, 2025 | 04:45 PM
Congress leader Satej Patil is aggressive as there is no opposition leader in the assembly yet.

Congress leader Satej Patil is aggressive as there is no opposition leader in the assembly yet.

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मात्र हा महामार्ग सुरुवातीपासून चर्चेमध्ये आला आहे. यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावर आता कॉंग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गावर राज्यपालांनी केलेल्या उल्लेखावर विचार मांडले. यावेळी बोलताना, “प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? 86 हजार कोटी रूपये खर्चून होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गातून टोल वसूल करण्यासाठी 3 हजार दरवर्षी याप्रमाणे किमान 28 वर्ष लागतील आणि यासाठी दरवर्षी 60 लाख वाहने या रस्त्याने गेली पाहिजेत,ठ अशी वस्तुस्थिती मांडली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याऐवजी नागपूर- गोवा महामार्गावर जी जी शक्तीपीठे येणार आहेत त्या मंदिराच्या विकासासाठी 5- 5 हजार कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांचा विकास करावा अशी मागणी केली. त्यामुळे शक्तीपीठांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुखसोयी उपलब्ध करून तिर्थक्षेत्रांचा विकास साधला येईल असेही सुचवले.

शक्तिपिठाच्या अट्टाहासाखातर राज्यातील 27 हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकू नका अशी आर्जव करताना शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा वटहुकुम सरकारने काढला असाताना पुन्हा तो राबवला जात आहे ही नागरीकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक नाही काय ? असा अशी विचारणाही सभागृहात केली. शेवटी, राज्यभरात शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे तरीही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा विषय येतो हे दुर्दैव असून त्याविषयी खेद व्यक्त केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मागिती दिली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरहून सुरू होणार असला तरी त्याची खरी सुरुवात वर्ध्याच्या सेवाग्राम समृद्धी महामार्गावरून होईल. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि औदुंबर दत्तगुरुंची स्थाने यासारखी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे जोडली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. हा महामार्ग केवळ पर्यटनासाठी नसून तो मराठवाड्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणार आहे. विशेषतः मराठवाड्यातून हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर जाणार असून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडण्याचे काम तो करेल. शक्तीपीठ महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांचा त्रिकोण तयार करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Web Title: Mla congress leader satej patil opposes shakti peeth highway in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Satej Patil
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
3

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.