राज्यात फॉरेन्सिक लॅबचे जाळे सक्षम केले जाणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वपूर्ण माहिती (Photo Credit- Social Media)
मुंबई : राज्यातील प्रमुख शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग तब्बल १२ जिल्ह्यांतून जाणार असून, विशेषतः मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा महामार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडणार आहे. तसेच, समृद्धी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असे त्रिकोणी नेटवर्क तयार होणार असल्याने राज्यातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांना मोठा बूस्ट मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “कोल्हापूरसह काही भागांमध्ये या महामार्गाला विरोध असला तरी, कोल्हापुरातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मात्र या महामार्गाच्या उभारणीची मागणी केली आहे.”
Maharashtra Budget: दीड कोटी ग्राहक होणार वीजबील मुक्त, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील रस्ते विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत १३,९०० किमी रस्ते बांधण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. यात कोणताही मतदारसंघ डोळ्यासमोर न ठेवता नियोजन केले जात असून,
अशी मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरहून सुरू होणार असला तरी त्याची खरी सुरुवात वर्ध्याच्या सेवाग्राम समृद्धी महामार्गावरून होईल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे.’
Maharashtra Budget: दीड कोटी ग्राहक होणार वीजबील मुक्त, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि औदुंबर दत्तगुरुंची स्थाने यांसारखी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे जोडली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हा महामार्ग केवळ पर्यटनासाठी नसून तो मराठवाड्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणार आहे. विशेषतः मराठवाड्यातून हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर जाणार असून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडण्याचे काम तो करेल. शक्तीपीठ महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांचा त्रिकोण तयार करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.