MLA Mauli Katke reaction on political connections of Dattatreya Gade Swargate crime case
पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. बसस्थानकामध्ये असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. तरुणीला फसवून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. घटना घडून 50 तास होऊन देखील आरोपीला अटक न झाल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे. दत्तात्रय गाडे असे या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. याचे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा आहे. एका अजित पवार गटाच्या आमदाराच्या फ्लेक्सवर त्याचा फोटो असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचार प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या नजरेत आला आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर चोरी अशा सारखे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याचा फोटो देखील समोर आला असून शोधून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये दत्तात्रय गाडे हा शिरुरचा असून गुनाट गावाचा रहिवासी आहे. गाडे याचा शिरुर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांच्या फ्लेक्सवर फोटो असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोपी गाडे हा आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. याबाबत आता आमदार कटके यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वारगेट अत्याचार घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे हा आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आमदारांनी फेटाळला आहे. आमदार माऊली कटके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “मतदारसंघ हा अतिशय मोठा आणि विस्तृत आहे. मतदार संघातील कामानिमित्त अनेक लोक मला भेटत असतात. त्या आरोपीशी माझा कुठलेही संबंध नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केस फास्टटॅ्क कोर्टात हा खटला चालवावा, अशी मागणी माझी आहे,” असे आमदार माऊली कटके म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी आरोपी असलेल्या माऊली कटके याने उज्जैन यात्रेचे आयोजन केले असल्याचा आरोप केला. तसेच हे आयोजन आमदार माऊली कटके यांच्या निधीतून केले असल्याचा आरोप देखील केला. यावर आमदार कटके म्हणाले की, “आरोपीशी माझा कोणताही संबंध नाही.अशा विकृती असणाऱ्या व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे. देवदर्शन करुन आणलं असलं तरी कोणताही संबंध नाही,” असे मत आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा स्वारगेट बसस्थानकावर हा प्रकार झाल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील ॲक्शनमोडमध्ये येत आढावा घेतला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न असल्याचे कदम म्हणाले आहेत. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील बंद असलेल्या सर्व बस भंगारमध्ये लवकरात लवकर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.