Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP MLA assaults rickshaw driver : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक

घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शाह यांनी मराठी रिक्षा चालकाला मारहाण करत कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 22, 2025 | 11:51 AM
MLA Parag Shah assaulted a rickshaw driver in Ghatkopar Sanjay Raut reacts aggressively

MLA Parag Shah assaulted a rickshaw driver in Ghatkopar Sanjay Raut reacts aggressively

Follow Us
Close
Follow Us:
  • घाटकोपरमध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण
  • भाजप आमदार पराग शाह यांनी रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावली
  • खासदार संजय राऊतांनी घेतली आक्रमक भूमिका
MLA Parag Shah assaults rickshaw driver : मुंबई : घाटकोपरमध्ये रिक्षाचालकाला भररस्त्यामध्ये मारहाण केल्याचा प्रकार घडला. आश्चर्याची बाब म्हणजे ही मारहाण भाजप (BJP Politics) आमदारांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षा चालकाला भररस्त्यात कानशिलात लगावली. तसेच या रिक्षाचालकाला शिवीगाळ देखील केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral News) असून आमदारांना कसला माज आहे असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. या घटनेच्या विरोधात ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह यांनी घाटकोपर येथे आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. भाजप आमदार पराग शाह यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केली. रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पराग शाह यांचा राग अनावर झाला. मात्र रिक्षा चालकाने नियम मोडले असले तरी त्याच्यावर अशा पद्धतीने हात उचलणं आणि कायदा हातामध्ये योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केलं होतं. त्यानंतर भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली. पराग शाहांच्या या भेटीदरम्यान, महात्मा गांधी मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, चुकीच्या दिशेने गाडी चालवत एक रिक्षा चालक आला. त्या वेळी पराग शाह यांनी त्या रिक्षा चालकाला मारहाण केली.

“BJP MLA Slapped an Auto Driver.” 🚨 A video of BJP’s MLA Parag Shah went viral after he slapped an Auto-Rickshaw driver in Ghatkopar, Maharashtra. Utterly shameful! This is how the BJP treats common people. pic.twitter.com/ACtPwmTPZ7 — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) December 21, 2025

हे देखील वाचा : महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…

खासदार संजय राऊत यांनी या मराठी रिक्षाचालकाला केलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपचे आमदार पराग शाह हे रस्त्यावर उतरुन एका मराठी रिक्षावाल्याला मारतात. तो रिक्षावाला चुकला असेल, त्याने नियम मोडला असेल. पण भाजपचे सरकार रोज नियम मोडत आहे. भाजपने नियमबाह्य पद्धतीने मुंबई अदानीला देऊन टाकली. मग पराग शाह जाऊन अदानींची कॉलर पकडणार आहेत का, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? पराग शाह हे देवेंद्र फडणवीसांना मिठागाराची आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Mla parag shah assaulted a rickshaw driver in ghatkopar sanjay raut reacts aggressively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • BJP
  • Mumbai News
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…
1

Nagarpalika Election Results: महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले…

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला
2

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…
3

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान
4

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.