
MLA Rohit Pawar targeted the Election Commission for not releasing the voting figures
महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु झाली असून मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या अनेक पालिकांमध्ये प्रतिष्ठेची लढत होत आहे. मात्र अनेक ठिकाणी भाजप पक्ष आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र मतदान प्रक्रियेवर विरोधकांनी संशय घेण्यास सुरुवात केली आहे. मतदानावेळी पुसला जाणारा मार्कर खुण करण्यासाठी वापरल्यामुळे अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली. हातावरची शाई पुसून दुबार मतदान केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र दिवसाच्या शेवटी प्रभागामध्ये किती टक्के मतदान झालं याची शेवटची आकडेवाडी प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर संशय घेतली आहे.
हे देखील वाचा : पिंपरी चिंचवडचा “दादा’ कोण होणार? मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आघाडीवर
रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले की, काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना? असा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांन उधाण आले आहे.
काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी… — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2026
हे देखील वाचा : मुंबईत विजय महायुतीचा निश्चित अन् महापौर…! देवेंद्र फडणवीसांचा मतमोजणीवेळी मोठा निर्धार
आमदार रोहित पवार यांनी पुढे लिहिले आहे की, आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं, पण किमान आम्ही भाजपाची B-Team आहोत हे तरी मग जाहीर करावं! असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला आहे. निवडणूक आयोगाने शेवटची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे संशय घेतला जात आहे. टप्पाटप्प्याने होणाऱ्या मतदानाचे आकडे आणि आकडेवारी ही आयोगाकडून जाहीर होत असते. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये अनेक प्रभागांमध्ये शेवट किती टक्के एकूण मतदान झाले हे समोर आलेले नाही. यामुळे आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे.