Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच संतोष बांगरांचा ‘मास्टरस्ट्रोक’; ‘या’ निवडणुकीत विरोधकांना चेकमेट

पिंपळदरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोतरा आखाडा बाळापूर आणि पिंपर तीन सर्कल होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने मोठा फरकाची अपेक्षा होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2025 | 11:58 AM
स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच संतोष बांगरांचा 'मास्टरस्ट्रोक'; 'या' निवडणुकीत विरोधकांना चेकमेट

स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच संतोष बांगरांचा 'मास्टरस्ट्रोक'; 'या' निवडणुकीत विरोधकांना चेकमेट

Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 18 पैकी तब्बल 17 जागांवर विजय मिळवत बांगर गटाने एकहाती सत्ता काबीज केली. सोमवारी पार पडलेल्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत दत्तराव बोंढारे यांची सभापतिपदी आणि संजय भुरके यांची उपसभापतिपदी निवड करून बांगर यांनी विरोधकांना थेट चेकमेट दिले.

भुरके यांच्या निवडीने आदिवासी समाजात आनंदाची लाट उसळली असून, या निर्णयामुळे कळमनुरी मतदारसंघात शिंदे सेनेला आदिवासींचे ठोस पाठबळ मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आखाडा बाळापूर बाजार समितीवर जवळपास मागील वीस वर्षांपासून बोंढारे यांची सत्ता होती. सुरुवातीचे दहा ते बारा वर्षे संजय बोंढारे सभापती होते. यानंतर त्यांच्या चिरंजीव दत्ता बोंढारे यांच्याकडे सत्ता होती. असे असले तरी शिवसेना शिंदे गटातूनच नाराजी व्यक्त केली जात होती. आणि मतपेटीतून दिसूनही आले.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मागील पंधरा दिवसांपासून त्यांच्या मातोश्री आजारी असल्याने मुंबईत होते. परंतु शेवटच्या दोन दिवसात आमदार मतदारसंघात आले आणि त्यांनी प्रचाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. आमदारांच्या जादूच्या कांडीमुळे बाजार समितीवर झेंडा फडकवला.

बाळापूर आणि पिंपळदरी सर्कलने तारले

पिंपळदरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पोतरा आखाडा बाळापूर आणि पिंपर तीन सर्कल होते. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतल्याने फार मोठा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही. उलट आखाडा बाळापूर आणि पोतरा या सर्कलवर शिवसेना शिंदे गट मागे होता. आखाडा बाळापूर सर्कलच्या मतमोजणी ६० ते ७० मतांनी शिंदे सेना मागे होते. तर पोतरा सर्कलच्या मतमोजणीत दहा ते वीस मताचा फरक होता. मात्र, पिंपळदरी सर्कलच्या पेट्या उघडताच चित्र बदलले. या सर्कलच्या २११ मतांपैकी १२ मते बाद झाली.

काही मते शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात

उर्वरित १९९ मतापैकी १४९ मते शिंदे सेनेच्या पारड्यात पडली. हा भाग आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या भक्कम पाठबळामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला बाळापुर बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करता आले. या आदिवासी समुदायाने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर शिंदे सेना विजय झाली आणि याची पावती म्हणून संजय भुरके यांना उपसभापतिपद देण्यात आले.

Web Title: Mla santosh bangar masterstroke even before the local government elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maharashtra Politics
  • MLA Santosh Bangar

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; चिमणकर बंधू दोषमुक्त
1

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; चिमणकर बंधू दोषमुक्त

Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात साजरा करणार 75 वा वाढदिवस
2

Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात साजरा करणार 75 वा वाढदिवस

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका
3

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका

भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; ‘या’ पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा
4

भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; ‘या’ पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.