Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026 : भाजप-शिंदे गटात जुंपली? भाजपच्या आरोपांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर भाजपकडून शिंदे गटावर आरोप करण्यात आले असून एकनाथ शिंदेंनी युतीधर्मावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 29, 2026 | 07:38 PM
Eknath Shinde

Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत नाराजी?
  • भाजपकडून शिंदे गटावर आरोप
  • एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
 

MLC Election 2026 : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र समोर आले असून, पाचपैकी दोन जागांवर महायुतीचे, तर तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालानंतर भाजपकडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भाजप मंत्री मितेश राणे यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर आरोप करण्यात येत असून यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपच्या आरोपांवर शिंदेंचं उत्तर

शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळत आली आहे, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. भाजप आणि शिवसेनेमध्ये चार ठिकाणी युती होती. पुणे मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार आणि भाजपच्या उमेदवारामध्ये मैत्रीपूर्ण लढत होती, असेही त्यांनी नमूद केले.

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

युतीमध्ये असताना सहकारी पक्षाला साथ देणे आणि ठरलेली भूमिका निभावणे महत्त्वाचे आहे, अशी शिवसेनेची भूमिका राहिली आहे, असे शिंदे म्हणाले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या आरोपांवरून महायुतीमधील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मदतीचा हात

राजकीय घडामोडींवर बोलतानाच शिंदे यांनी दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शेतकऱ्यांच्या अडचणी, मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी आणि शेतीशी संबंधित प्रश्नांमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली असून, साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ही रक्कम तातडीच्या मदतीसाठी असून, दुष्काळग्रस्तांना लागू असलेल्या इतर सवलतींचाही लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शाळेची फी आणि इतर सवलतींबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे विधान परिषद निकालावरून महायुतीतील समन्वयाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावर सरकार भर देत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आता भाजपकडून या निकालाबाबत पुढे काय भूमिका घेतली जाते आणि महायुतीतील आरोप-प्रत्यारोपांना कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: विधान परिषद निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळाल्या?

    Ans: पाचपैकी दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर तीन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.

  • Que: भाजपच्या आरोपांवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    Ans: शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळत आली आहे आणि युतीधर्म पाळावा, हीच पक्षाची भूमिका राहिली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने किती निधी जाहीर केला?

    Ans: सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. तातडीच्या आर्थिक मदतीसोबतच शैक्षणिक शुल्क आणि इतर सवलतींचाही लाभ मिळणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Mlc election 2026 eknath shinde reaction on bjp allegations vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MLC Election
  • shivsena

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
1

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका
2

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाण्यात पराभव करता येत नाही, म्हणून बदनामीचा डाव; मिलिंद देवरा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली
3

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
4

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.