मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची युतीकडून परतफेड होणार?
मुंबई : राज्यामद्ये लवकरच विधानसबा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते तयारीला लागले आहेत. भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह यांनी देखील महाराष्ट्रक दौरा करत जागावाटपाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील जनसन्मान यात्रा सुरु असून शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेतून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती नामक तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्ष देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. जवळ जवळ सर्वच प्रमुख पक्ष फुटल्यानंतर आता मनसेकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभेमध्ये मनसे महत्त्वाची भूमिका बजावणार असून ही निवडणूक जोरदार रंगणार आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानात उतरले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत.
विदर्भाची पहिली यादी जाहीर
येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा घेणार आहेत. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभेला राज्यातील प्रमुख पक्षांची दोन युती आणि तिसरी नवीन निर्माण झालेल्या युतीला लढा देण्यासाठी मनसेकडून पूर्ण तयारी केली जात आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीच विधानसभा निवडणूकीसाठी सात उमेदवार जाहीर केले आहेत. आता या विदर्भ दौऱ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या मनसैनिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.