mns raj thackeray sabha live target narendra modi showing video election commission fraud
Raj Thackeray: मुंबई : मनसे नेते राज ठाकरे यांचा दाधिकारी मेळावा सुरु आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ठाकरेंसोबत युतीची शक्यता यामुळे राज ठाकरे हे काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. राज ठाकरेंनी निवडणुक आयोगावर निशाणा साधला मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भरसभेमध्ये व्हिडिओ दाखवत जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीला 232 जागा मिळाल्या होत्या. मात्र तरी निकालानंतर कुठेही जल्लोष नव्हता. मोठ्या निकालानंतर देखील सर्वत्र सन्नाटा होता. कारण मतदार सुद्धा आवाक् झाले होते पण जे निवडून आले तेही आवाक होते. असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. राज ठाकरेंनी मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचे म्हणत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले तर सत्ताधारी उत्तर देतात. 2016-17 ला मतदार याद्यांवरून प्रश्न निर्माण केला होता. पण यांना बोगस मतदानाबद्दल विचारलं की राग येतो, असा टोला देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “मतदान करा अथवा नका करू मॅच फिक्स आहे. एका घरात ८०० माणसं, ७०० माणसं अशी नावं दिली जात आहेत. जे मतदार नाहीत, अशी सगळी खोटी नाव भरुन हे सर्वजण निवडणुकीला सामोरे जायचं म्हणतं आहेत. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतात ती मतदार यादी जोपर्यंत पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा,” असे ओपन चॅलेंज राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांच्या भाषणाची आणि बोलण्याची पद्धत हटके आहे. भर सभेमध्ये नेत्यांचे व्हिडिओ दाखत थेट पुरावे दाखवणे ही राज ठाकरेंची स्टाईल आहे. निवडणूकांमधील घोळांवर राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ दाखवला. यामध्ये नरेंद्र मोदी यांचे आसाम मधले 15-20 सेकंदाचे भाषण ऐकवले गेले. जेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाचा त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ राज यांनी दाखवला. यामध्ये भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आसामच्या सभेतील भाषण असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान हा व्हिडीओ दाखवल्यानंतर, ‘मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय’ असं म्हणत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.