तिकीट कापल्याने लालू प्रसाद यादवांच्या घरासमोर मदन शाहांचे 'कुर्ता फाड' आंदोलन
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अनेक जागांवर तिकीटवाटपावरून तणाव दिसू लागला आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर बिहारचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. बिहारमधील मधुबन विधानसबा मतदारसंघाचे राष्ट्रीय जनता दलाचे माजी उमेदवार मदन शहा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानासमोर मोठमोठ्याने रडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मदन शाहांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर तिकीटासाठी पैसे मागितल्याचा आरोपही केला आहे.
पुण्यात गुंडाराज ! मार्केटयार्ड भागात पोलिसावरच हल्ला, लोखंडी कड्याने डोळ्यावर…
मदन शाह यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत संजय यादव तिकीट विकत असल्याचा आरोप केला आहे. संजय यादव यांनी त्यांच्याकडे २७ कोटी रुपये मागितल्याचाही दावा केला आहे. तसेच, मदन शाहांनी पैसे देण्यास नकार दिला असता संजय यादव यांनी तिकीट रद्द केले आणि डॉ. संतोष कुशवाहा यांना देण्यात आले. संतोष कुशवाहा हे सीमांचल प्रदेशातील जेडीयुचे एक प्रमुख नेते होते. ते अलीकडेच राष्ट्रीय जनता दलात समील झाले आहेत. पण आपण १९९० पासून राष्ट्रीय जनता दलात आहोत. असंही त्यांनी नमुद केल.
पूर्व चंपारण्यमधील मधुबन विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार मदन शाह माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या १० सर्कुलर रोड येथील निवासस्थानी पोहोचले होते. आरजेडीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी त्यांचा कुर्ता फाडला आणि रस्त्यावर पडून निषेध नोंदवला. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने आदीच आपल्या अनेक जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात अशा अनेक जागांचाही समावेश आहे, जिथे त्यांनी स्वत:च्या मित्रपक्षांच्या उमेदवारांविरूद्धही उमेदवार उभे केले आहेत.
कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहली लंडनला का गेला? स्वतः खेळाडूने दिले उत्तर
राबडी देवींच्या निवासस्थानासमोर रडत रडत मदन शाह म्हणाले, “मला २७ कोटी रुपये आणायला सांगण्यात आले होते आणि मी उद्ध्वस्त झालो. माझे दोन मुलगे आणि मुली आहेत. मी कोणाशीही लग्न केलेले नाही. तिकीट चोरीला गेले आणि विकले गेले.” मदन शाह यांनी असेही सांगितले की त्यांनी २०२० च्या निवडणुका लढवल्या आणि २००० मतांनी पराभव पत्करला. संजय यादव हरियाणातून येतात आणि तिकिटे विकतात. मदन यादव यांनी असेही सांगितले की ते १९९० पासून राजदशी जोडलेले आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बिहार विधानसभा निवडणूक २०२५ चा संपूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २४३ विधानसभा जागांसाठी निवडणुका दोन टप्प्यात होतील. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होईल आणि निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. वेळापत्रकाची घोषणा होताच, संपूर्ण बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.