
MNS Raj Thackeray target cm devendra fadnavis in maharashtra local body elections
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेमध्ये झालेल्या बंडांची उजळणी करुन देत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला नको होते असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह हे स्वतःच्या हिंमतीवर मुख्यमंत्री झाले आहेत मात्र असे देवेंद्र फडणवीसांच्याबाबतीत नाही. एक माणूस मुख्यमंत्री होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाले. त्यानंतर शिवसेना फोडली. मग एक व्यक्ती मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. यानंतर निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. आणि त्यांनी तेव्हा स्वीकारलं, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरी बोलून दाखवली.
हे देखील वाचा : वृद्ध पालकांना सांभाळले नाही तर होणार १०% पगार कपात; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पुढे ते म्हणाले की, जर एखादा बसलेला माणूस असता आणि ठाम असता तर त्याने नकार दिला असता. बसलेला आणि बसवलेला माणूस यात फरक असतो. भारतीय जनता पक्ष जो आम्ही पूर्वीपासून बघत होतो तो भारतीय जनता पक्ष आता राहिला नाही. आणि ही गोष्ट भाजपमध्ये असणारी लोक सुद्धा मान्य करतात.
राज ठाकरे यांनी गोतमी अदानीच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, गौतम अदानी यांनी स्वत:हून देशातील कुठलंही विमानतळ उभं केलेलं नाही. ज्या व्यवसायामध्ये गौतमी अदानी कधीही नव्हते, त्या सिमेंटच्या व्यवसायात 2 नंबरला अदानी गेले आहेत. दुसऱ्याचे व्यवसाय खेचून हे वर गेलेले आहेत, हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाही. मात्र, ही वाढ कशी होतेय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या विकासामागे मोदी सरकारचा मोठा हात असल्याचे म्हटले.
हे देखील वाचा : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात
एक उद्योगपती 10 वर्षात मोठा कसा होतो हा विषय आहे? टाटा, अंबानींनी स्वत: सगळे उद्योग उभे केले आहेत. त्यामुळे, हे असंच सुरू राहिल्यास एक दिवस हा देश ठप्प होईल, हे सांगण्याचा माझा उद्देश होता, असेही राज ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडून देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील भाषणावर पलटवार केला.