Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

खासदार प्रणिती शिंदे यांनी गडकरी यांचे कौतुक करत, "गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता," असे वक्तव्य केले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: May 15, 2026 | 02:31 PM
Praniti Shinde prizes Nitin Gadkari

Praniti Shinde prizes Nitin Gadkari

Follow Us
Follow Us:
  • नितीन गडकरी यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात २७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन
  • प्रणिती शिंदे यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले
  • सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो ते नेते म्हणजे नितीन गडकरी – प्रणिती शिंदे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात २७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमात सभेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी गडकरी यांचे कौतुक करत, “गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता,” असे वक्तव्य केले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

नितीन गडकरी यांनी सोलापूर दौऱ्यात २७८४ कोटींच्या ५ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, कर्नाटक राज्य धोरण आयोग अध्यक्ष बी आर पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे हे उपस्थित होते.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

यावेळी सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो ते नेते म्हणजे नितीन गडकरी. त्यांच्याकडे पक्षीय भेद नसतो. तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. आज जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता,” असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले.

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले

त्या पुढे म्हणाल्या, “आपण हा कार्यक्रम घेतला आणि त्यासाठी मला निमंत्रण पाठवले. आजच्या परिस्थितीत जिथे विरोधकांना शत्रू मानले जाते तिथे तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देता आणि आमची कामे मार्गे लावता. हे आमच्यासाठी नवल आहे आणि त्यासाठी तुमचे आभार मानते. तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजुरी दिली. त्यावेळेस मला असे वाटले कि तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. तुम्ही जर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता. महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाले असते. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणखी पुढे गेला असता,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

याच श्रेय माझं एकट्याच नाही – नितीन गडकरी

यावेळी सभेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, “विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र याच श्रेय माझं एकट्याच नाही. असंख्य इंजिनिअर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे. आम्ही २०० हजार कोटी खर्च करून बौद्ध सर्किट पूर्ण केले, असे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ

Web Title: Mp praniti shinde praises nitin gadkari over his progressive works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • praniti shinde
  • Solapur

संबंधित बातम्या

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
1

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा
2

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
3

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य
4

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.