Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : “शिंदेगट डेडबॉडी.. देवेंद्र फडणवीसांकडून त्यांचं ऑपरेशन सुरु; खासदार संजय राऊतांचा चढला पारा

Operation Tiger : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरु असल्याच्या चर्चा आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2026 | 11:18 AM
'फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील'; ऑपरेशन टायगर'वर संजय राऊतांचा पलटवार

'फोडाफोडीची नशा चढली, उद्या फडणवीसांनाही फोडतील'; ऑपरेशन टायगर'वर संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंच्या खासदाराविरोधात ऑपरेशन टायगर
  • खासदार संजय राऊतांनी साधला निशाणा
  • शिंदेंच्या सेनेचा डेडबॉडी म्हणून उल्लेख
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय बंडखोरी होणार असल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र डागले.

 

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले असून शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचे नेते फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “बघा ऑपरेशन जे असतं ना ते एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेडबॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेडबॉडी नेतात ना.. आणि डेडबॉडी सध्या त्यांच्या पक्षाची ( शिंदे गट) देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खर म्हणजे ऑपरेशन सध्या जे सुरू आहे, ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करत आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेसेनेला धारेवर धरले.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय

पुढे राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे 9 खासदार, हे एकजुटीने एकत्रित आहेत. काही नावं ऐकून मलाच हसायला आलं. कुठेतरी ते छापून आलं, मला पाठवलं ते. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आहे. ज्या कोणी ही बातमी दिली आहे, त्याने स्वत:चं हसं करून देणारी बातमी दिली आहे. कोणाकोणाची नावं त्यात टाकलीत, उद्या माझंही नाव त्यात टाकतील, आमच्या आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील ना. काही नाही सध्या अशा ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, वातवरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोड करतोय हे दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे,” अशी टीका राऊतांनी केली.

हे देखील वाचा : पीकविम्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक; ३३४ हप्ता भरूनही फक्त १८३ रुपयांची भरपाई

त्याचबरोबर बारामतीच्या पोटनिवडणुकीमधून काँग्रेस पक्षाने माघार घेतली. यावर ते म्हणाले की, “काँग्रेसने बारामतीतून माघार घेतली, कारण त्यांना अनेकांनी विनंती केली. राष्ट्रवादाची धोरणात्मक मागणी होती. अजित पवारांच्या निधनाची चौकशी व्हावी. भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीची परंपरा मोडली. राहुरीची आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे, त्यात तुलना करू नका. भाजपने सुशिक्षितपणा आणि सभ्यपणा निवडणुकीत कधी दाखवला नाही,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Web Title: Mp sanjay raut criticizes eknath shinde operation tiger calls as dead body maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
1

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
2

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
3

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
4

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.