Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी आरक्षणावरुन छगन भुजबळ सरकारवर नाराज! राजीनामा द्यावा अशी शिवसेना नेत्याची मागणी

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2025 | 12:05 PM
mp sanjay raut demand Chhagan Bhujbal Resignation for upset on obc reservation

mp sanjay raut demand Chhagan Bhujbal Resignation for upset on obc reservation

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केले. आझाद मैदानावर त्यांनी हजारो समर्थकांसह उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या पूर्ण केल्या. यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या आदेशाविरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची तयारी देखील दाखवली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीला देखील छगन भुजबळ यांची अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आले. यावरुन आता खासदार राऊत यांनी छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मराठा-ओबीसी संघर्ष वाढले असे आपल्याला वाटत नाही. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकार मधील काही घटक आजही करत आहेत. सरकारमधील काही सहकाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊच नाही आणि सरकार अडचणीत यावं असं वाटतं होतं. महायुती ही तीन चाकाची रिक्षाच आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आलं. शिंदे यांनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

खासदार राऊत म्हणाले की, “भुजबळ हे नाराज आहेत की नाही, यापेक्षा ते मंत्रिमंडळात समाधानी आहेत, असे दिसते. भुजबळ हे नाराज असतील तर ते राजीनामा देतील का? जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का? त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख यांचे नेहरूंशी मतभेद झाल्यावर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात. मग भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. पण ओबीसींचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. महाराष्ट्र जाती-पातीत कधीच इतका वाटला गेला नव्हता. गेल्या 10 वर्षात या देशात जाती-पोटजातीचे राजकारण सुरू आहे. मराठी माणसांच्या एकजुटीला फोडण्यासाठी पक्ष फोडले. तसाच हा प्रकार आहे. आता जातींच्या उपसमित्या तयार करून हाच मार्ग अवलंबल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.

Web Title: Mp sanjay raut demand chhagan bhujbal resignation for upset on obc reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • OBC Reservation
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
1

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप
2

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप

Bawankule Mobile Surveillance: चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्काळ अटक करा; संजय राऊतांचा चढला पारा, राजकारण तापलं
3

Bawankule Mobile Surveillance: चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्काळ अटक करा; संजय राऊतांचा चढला पारा, राजकारण तापलं

BMC Elections 2025: राज ठाकरेंसाठी शिवसेना सोडणार का कॉंग्रेसचा हात? खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4

BMC Elections 2025: राज ठाकरेंसाठी शिवसेना सोडणार का कॉंग्रेसचा हात? खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.