MP Sanjay Raut demand to send an all-party delegation to China and Turkey political news
मुंबई : पगलगाम हल्ल्याचे प्रत्यत्तुर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय सैन्याची ताकद दिसून आली. यानंतर आता केंद्र सरकारने शिष्टमंडळाची स्थापना करुन भारताची भूमिका कानाकोपऱ्यामध्ये पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. यामधील सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये ठाकरे गटाचा एकही नेता नसल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या शिष्टमंडळामध्ये ठाकरे गटाचा एकही खासदार न घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत हे शिष्टमंडळ सर्वपक्षीय म्हणता येणार नाही अशा शब्दांत टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत म्हणाले की, “या सगळ्या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर एक नंबरची व्यक्ती कोण असेल तरी ती शशी थरूर आहे. भाजपने हा विषय राजकीय केला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे महाशय काय मांडणार? इतक्या घाईघाईने हे करायची गरज नव्हती विरोधी पक्षाची मागणी काय विशेष अधिवेशन घ्यावं आणि चर्चा करावी,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
INDIA ब्लॉक च्या सदस्याने बहिष्कार टाकावा
पुढे संजय राऊत यांनी केंद्र सरकारला डोनाल्ड ट्रम्पसोबत चर्चा झाल्याचा आरोप करत घेरण्याचा प्रयत्न केला. भारत पाकिस्तान युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळे संजय राऊत यांनी संशय उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत काय चर्चा झाली हे सांगावं. हे सगळं कोणी ठरवले आहे तक किरेन रिजिजू यांनी ठरवलं आहे. शिवसेनेचे लोकसभेत 09 सदस्य आहे. शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार आहेत. हे वऱ्हाड पाठवायची गरज नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी कमजोर आहेत, एवढे देश फिरले तरी हे जागतिक जात आहे. INDIA ब्लॉक च्या सदस्याने बहिष्कार टाकावा,” अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. हे पुस्तक प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावरुन जोरदार राजकारण रंगले होते. पुस्तकामध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत ‘नरकारतील राऊत’ असा टोला देखील लगावला. यानंतर संजय राऊत म्हणाले की, “काल पुस्तकाच प्रकाशन जोरदार पद्धतीने झालं. भाजपने देखील त्याचं जोरदार स्वागत करायला हवं होतं. जे भाजप मध्ये नव्हते ते या पुस्तकाबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. काही लोक मातोश्रीच्या झाडाखाली उभे राहत होते त्यांना आतल्या काही गोष्ट माहीत नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.