Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Live : पक्षाचा बापच अनौरस, तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात

Sanjay Raut Live : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2025 | 12:02 PM
BMC Election 2026, BMC Election Result 2026,

BMC Election 2026, BMC Election Result 2026,

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये साधला संवाद
  • संजय राऊत यांचे महायुतीवर टीकास्त्र
  • राष्ट्रवादीला युतीमध्ये घेण्यावर केले भाष्य
Sanjay Raut Live : मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती (Thackeray Brothers Alliance) जाहीर केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसून फक्त खुर्ची आणि मतांसाठी हे एकत्र आले असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा बापच अनौरस असल्याची गंभीर टीका केली.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नसेल, तर त्यावर इतकी प्रतिक्रिया देण्याची गरज काय? काल त्यांच्या प्रवक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युती कशी महत्त्वाची आहे, हे सांगत बसण्याची गरज नाही. 16 तारखेला भेटू. ठाकरे बंधूंनी मला सांगावं—भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय अखंड महाराष्ट्र, बेळगाव-कारवार सीमा किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवणारा भाजपमध्ये कोण आहे?” असा सवाल खासदार राऊतांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र

पुढे ते म्हणाले की, “बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा केली. त्यावेळी ठाकरे उभे राहिले, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारणं हे फडणवीस यांचं कर्तव्य होतं. तुम्ही आम्हाला मराठी माणसावर शिकवू नका. ठाकरे आहेत म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे करून एखाद्या छोट्या भागाचे मुख्यमंत्री झाला असता. मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी संघर्ष केला आहे. तुम्ही मराठी माणसासाठी केलेली दहा कामं दाखवा. गौतम अदानीसारख्या मोदींच्या मित्राला मुंबई विकणं ही मराठी माणसाची सेवा नाही. दोन ठाकरे एकत्र आले आहेत, भाऊ एकत्र आले आहेत. तुम्ही तुमचं बघा. सत्तेसाठी एकत्र आलो असाल, तर ठीक आहे. पण तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश करायला एकत्र आलात का?” असा देखील टोला खासदार राऊत यांनी लगावला.

हे देखील वाचा : ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर देखील जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “मराठी माणसाची संघटना फोडली, बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चुकीच्या हातात दिली. महाराष्ट्र हे पाप कधीही माफ करणार नाही, याचा बदला मुंबई महापालिका निवडणुकीत घेतला जाईल. शिंदे यांनी स्वतःच्या मुलांची काळजी घ्यावी. भाजप त्यांच्या पोरांना पळवणार आहे. भाजपने कुत्रे पकडण्याच्या पिंजऱ्यासारखी केंद्रं उघडली आहेत. शिंदे यांचा पक्ष चोरीचा आहे. शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस आहेत. स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे. बापच अनौरस आहे.अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे. कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं, कोण पळवतंय ते,” अशी घणघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

ठाकरे बंधूंची युती झाली आणि कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आता महाविकास आघाडीमध्ये राहिलेला राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “मुंबईतील जागांच्या संख्येनुसार आणि ताकदीनुसार जागावाटप होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला सोबत हव्यात. मनसे-शिवसेनेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. आकड्यांमुळे युती तुटता कामा नये. जिथे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो, तिथे जागा सोडली पाहिजे. परिस्थिती बदलली असल्यास दोन्ही पक्षांनी जिंकण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा,” अशी सूचक प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Mp sanjay raut press conference live on targting mahayuti leaders maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • political news
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.