MP Sanjay raut press confernce on All-party delegation meet election commission from maharashtra
Sanjay Raut: मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरु असून सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. हे शिष्टमंडळ आयोगाबाबत तक्रारी, मतदार यादी यासह अनेक समस्या मांडणार आहे. याबाबत कोणते पक्ष घ्यायचे आणि कोणते नाही यावरुन पहिलेच वाद सुरु झाले आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी मत मांडले.
खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (दि.14) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार संजय राऊत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याचे समोर आले. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, आता माझी तब्येत चांगली आहे. लहानसहान बदल शरीरामध्ये होत असतात, असे खासदार संजय राऊत त्यांच्या प्रकृतीबाबत बोलले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राजकीय पक्षांची शिष्ट मंडळाला जाण्याची तयारी सुरू आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेत 45 लाख मतं वाढली त्याचा हिशोब द्यायला आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख ही मत डुबलीकेट आहेत. नाशिकमध्ये साडेतीन ते चार लाख मते हे डूब्लिकेट आहेत आणि हे लोक महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करणार यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रा समोर मांडायचे आहेत. एक एक मत चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा? शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला आम्ही पक्ष म्हणून मानत नाही कारण ते चोर आहेत, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोगाला भेटणारे हे शिष्टमंडळ सर्वपक्षीय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामध्ये मनसे पक्षाला घ्यायचे की नाही यावरुन वाकयुद्ध सुर आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, -राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणार काँग्रेस पक्ष नाही हा सामुदायिक निर्णय आहे. भारतीय जनता पार्टीचा एखादा नेता या शिष्टमंडळात आला असता तर त्याला काँग्रेसने विरोध केला असता का नाही, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.