Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीर सावरकरांच्या सन्मानावर आजही भाजप अन् ठाकरे गटामध्ये एकमत; राऊतांनी व्यक्त केला फडणवीसांवर विश्वास

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयावंर भाष्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

  • By प्रीति माने
Updated On: May 28, 2025 | 12:59 PM
mp sanjay raut press live thanks devendra fadnavis over veer savarkar degree certificate

mp sanjay raut press live thanks devendra fadnavis over veer savarkar degree certificate

Follow Us
Follow Us:

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्रा‘च्या उदघाटनाचा सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सावरकरांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनायक सावरकर यांची बॅरिस्टर पदवी परत आणण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचे शिवसेना ठाकरे गटाने स्वागत केले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “हे स्वागतहार्य गोष्ट आहे. वीर सावरकर यांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली, ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा आपला ठेवा आहे. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधील राहतं घर सरकारने ताब्यात घेतलं आणि तिथे मेमोरियल केलं. आम्ही त्याचं स्वागत करतो आणि केलं. वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली ते आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केली बॅरिस्टर ही पदवी आणि त्याला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. पण खरी पदवी आणा,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त चर्चेमध्ये आला आहे. संजय राऊत म्हणाले की, “वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच, तो कागदाचा तुकडा जरी ब्रिटिशांनी जप्त केला असला तरी आम्ही त्यांना बॅरिस्टर मानतो.  पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आहे. काल सुद्धा दिल्लीमध्ये पद्म पुरस्कारांचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होतं या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे. आम्ही किती वाट पाहायची? बाकी तुम्ही पदवी आणालं, त्यांचे कपडे आणालं, त्यांची टोपी आणालं. सर्व काही आणलं. पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे, त्यांच्या विचारधारेच्या तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीका कारांची तोंड बंद करण्यात आहे,” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ते शिफारस का केली नाही आणि मोदी आणि शाहांनी त्यांच्या पूर्ण हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?  बॅरिस्टरची पदवी आणाल, समुद्रात जिथे उडी मारली तिथे तुम्ही डोक टेकाल, वर्षानुवर्ष आम्ही करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाही. स्वातंत्र्यवीर ही त्यांना सर्वोच्च पदवी महाराष्ट्राने दिली. वीर ही पदवी मोदी, शाह यांनी किंवा भाजपने दिलेली नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिली. महाराष्ट्राने वीर सावरकर यांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करता,” असा टोला देखील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Web Title: Mp sanjay raut press live thanks devendra fadnavis over veer savarkar degree certificate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • sanjay raut
  • Swatantraveer Savarkar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा
3

Sanjay Raut: संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल;३०० खासदारांच्या मोर्चाची संजय राऊतांची घोषणा

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.