Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Eknath Shinde: 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. मोदींच्या या भूमिकेमुळे देशातील नागरिकांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळाल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 12:18 PM
मुख्यमंत्री ते पंतप्रधान... नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम; महाराष्ट्राच्या वतीने दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री ते पंतप्रधान... नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम; महाराष्ट्राच्या वतीने दिल्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:
  • ‘सेवा, संकल्प आणि समर्पणाची 25 वर्षांची यात्रा’
  • नरेंद्र मोदींच्या वाटचालीवर एकनाथ शिंदेंकडून गौरवोद्गार
  • नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला 25 वर्षे पूर्ण
Eknath Shinde: ७ ऑक्टोबर २००१ हा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. याच दिवशी राष्ट्रसेवक नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या या राजकीय प्रवासाला २५ वर्षे पूर्ण होत असताना, ही वाटचाल केवळ एका नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास नसून देशाच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रवासाचा महत्त्वपूर्ण अध्याय असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आणि शिवसेनेच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

“नरेंद्र मोदी यांची २५ वर्षांची वाटचाल ही सेवा, संकल्प आणि समर्पणाची यात्रा आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या अटळ संकल्पाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या नेतृत्वामुळे १४० कोटी भारतीयांच्या आत्मविश्वासाला नवी उंची मिळाली आहे,” असे शिंदे यांनी म्हटले.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून सुरू झालेला नरेंद्र मोदी यांचा प्रवास आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला आहे. या प्रदीर्घ प्रवासात देशाच्या विकासाला नवी दिशा देण्याबरोबरच भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

“भारताला महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणारी नरेंद्र मोदी यांची आगामी वाटचाल अधिक गौरवशाली ठरो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी अपार शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी स्टेडियमवर विकास भारत संकल्प सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ते एक असे व्यक्ती आहेत जे आपले जीवन एका ध्येयासाठी जगतात आणि सतत काम करणे हाच त्यांचा धर्म आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे देशाप्रती माझी जबाबदारीही सर्वात मोठी आहे आणि माझा मनापासून विश्वास आहे की देशातील प्रत्येक नागरिकाचा माझ्यावर सर्वात मोठा हक्क आहे. हा २५ वर्षांचा जनतेचा विश्वास, हा २५ वर्षांचा अनुभव हे एक मोठे भांडवल आहे आणि हे भांडवल केवळ मोदींचे नाही, हे भांडवल देशाचे आहे.”

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Web Title: Eknath shinde congratulates pm narendra modi 25 years political leadership journey sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • narendra modi

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
1

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा
2

‘कमिटमेंट इज कमिटमेंट’, प्रश्न सुटले नाहीत तर वर्षभरात राजीनामा देणार; अर्ज भरल्यानंतर मंगेश चिवटेंची घोषणा

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
3

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.