Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar MPSC Protest: भीमनवार यांनी परवा संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून काहीच उपयोग नाही, त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता.पण त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने हा विषय त्यांच्या कोर्टात गेला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 06, 2026 | 11:23 AM
Rohit Pawar MPSC Protest, Vivek Bhimanwar Resignation, Devendra Fadnavis

Rohit Pawar MPSC Protest, Vivek Bhimanwar Resignation, Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला राजीनामा
  • आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न झाल्यास ‘पुणे बंद’चा आमदार रोहित पवार यांचा थेट इशारा
  • पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ गेल्या ६ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू
Rohit Pawar MPSC Protest Pune: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठवला आहे. त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेतल्यास पुणे शहर बंद पाडू, असा इशारा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील एस.एम. जोशी पुलाजवळ एमपीएसीच्या विद्यार्थ्याचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार हे या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. विवेक भीमनवार यांनी राजीनाम दिला असून तो तातडीने घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

भीमनवार यांचा राजीनामा घेतल्यास उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील

भीमनवार यांनी परवा संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून काहीच उपयोग नाही, त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता.पण त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने हा विषय त्यांच्या कोर्टात गेला आहे. पण भीमनवार यांचा राजीनामा घेतल्यास उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील, उद्या मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा खेळ सगळा त्यांच्या इगोवर आला आहे. अशी टिकाही रोहित पवार यांनी केली.

पावसातील दीर्घ खंडाचा खरीप हंगामाला फटका; पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पीकनुकसानीचे पंचनामे सुरू

भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांवरील ताण वाढवला

खरंतर भीमनवार यांनी राज्यपालांकडे राजीनामा देणे अपेक्षित होते. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. भीमनवार यांनीही खेळी खेळली असावी, मी राजीनामा दिलाय, आता तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यामुळे त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे. पण आजच्या मंत्रिमंडळाचा बैठकीत राजीनाम्यावर निर्णय नाही झाला तर आम्ही पुणे बंद पाडू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

आम्हाला आतल्या गोटातून माहिती मिळाली आहे. भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांवरील ताण वाढवला आहे. आता मित्राला वाचवायचे की इगो जपायचा की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या. दुपारी कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो ते पाहू, नाहीतर ठरल्याप्रमाणे आम्ही पुणे बंद पाडणार, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू असल्याने पुणे पोलिसांनी २९ खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य 

 

पुण्यात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी तीन ठिकाणी आंदोलने

पुण्यात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी तीन ठिकाणी आंदोलने सुरू असून ही आंदोलने बेकायदा असल्याचे सांगत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनस्थळी पुरावे गोळा करण्यासाठी चित्रीकरण करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर भाष्य केले. पोलिसांकडून टेलिग्राम चॅनेललाही नोटिसा पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून नोटीस देण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी म्हटले. “माझी पुणे पोलिसांना विनंती आहे की, दिल्ली पोलिसांप्रमाणे वागू नका. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा पार्श्वभूमी अन् मागण्या

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करून नवीन पारदर्शक अध्यक्षांची नियुक्ती करावी.

परीक्षा प्रक्रियेतील विलंब, उत्तरतालिकांमधील गोंधळ आणि कथित गैरप्रकार थांबवून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करत पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.

“विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा सरकारचा अहंकार मोठा असू शकत नाही. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भीमनवार यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरून पुणे बंद करू.”

— रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस SP)

 

Web Title: Pune rohit pawar threatens pune bandh over mpsc chairman vivek bhimanwar resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MPSC
  • pune news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल
1

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय
2

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
3

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
4

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.