mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. काल शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजी व्यक्त करणे सुधाकर बडगुजर यांना महागात पडले आहे. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन करून बजगुजर यांची हकालपट्टी केली जात असल्याची घोषणा केली. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकऱणी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर आता खासदार संजय ऱाऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत हे देखील नुकतेच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन आले आहेत. नाशिकमध्ये देखील त्यांनी बैठक घेतली होती. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांच्यावर पक्षातून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “कोणी फडणवीस यांना भेटलं, मोदींना भेटलं त्याच्यामुळे नाराजी आहे. आमच्यासारखे लोक किंवा कडवट शिवसैनिक टाळतात. त्याच्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमध्ये गोंधळ होईल, संशयास्पद वातावरण निर्माण होईल, अशा भेटी टाळायच्या असतात. जेणेकरून आपल्याबद्दल संशय निर्माण होईल आणि कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरुद्ध कोणी कायदा आणलेला नाही. बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही,’ असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले,” एखादं दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे असे नाही. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. आज पक्ष अडचणीत असताना लोकांना लाभ हवे आहेत, त्या लाभासाठी लोकं पक्ष बदलत आहेत. नाराजीचं म्हणालं तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत देखील नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्यासोबत देखील नाराज आहेत. पाहा त्यांचा चेहरा. या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती नाराज दिसत नाही, ते म्हणजे अजित पवार. हे त्यांचं कौतुकास्पद स्कील आहे. अजित पवार कधीच नाराज दिसत नाही. ते शरद पवार यांच्या सोबत असो किंवा फडणवीस यांच्याबरोबर असो, प्रधानमंत्री यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटी सिंचन घोटाळा आरोप केला तरीही ते नाराज नव्हते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सर्वाधिक खुश होते, आता माणसाला का आणि कशाकरता नाराज व्हावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे राजकीय प्रश्न नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद सुरु आहे. महाजनांवर राऊतांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, “यांच्या भ्रष्टाचाराच्या आणि इतर असे प्रकरणं आहेत, गिरीश महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाचा व्यक्ती आहे? हा एक ठेकेदार आहे. तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. साडेतीनशे फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयात पडून आहेत. मिस्टर फडणवीस मी सांगतोय ते बघा. तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळायला पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.