mp sanjay raut target devendra fadnvais and nitesh rane on aaditya thackeray clean chit
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार आरोप केले जात होत होते. या प्रकरणामध्ये आता आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी टीका करणाऱ्या सर्व नेत्यांना जोरदार फैलावर घेतले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनने ९ जून २०२० रोजी मालाडमधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणावर आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले होते. यामध्ये क्लीन चीट मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा जर क्लिनचीटचा रिपोर्ट आला आहे. ही आत्महत्याच आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राणेंचा मुलगा आहे ना. तो एवढा एवढा, त्याला टिल्या म्हणतात. तो मंत्री आहे. तो, देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री आहेत, तसेच एकनाथ शिंदे आहेत या लोकांनी शिवसेनेची आणि आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे. एका तरुण नेत्याला त्यांनी घेरलं,बदनाम केलं पण आम्ही मागे हटलो नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे थोडीशी देखील नैतिकता असेल तर आदित्य ठाकरेंची माफी मागा. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्याचं काम केलं. सत्य समोर आलं. आता काय करणार?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी महायुतीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे. ज्यांनी आऱोप केले आणि बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे. तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता, यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करता तुम्ही. पण लक्षात ठेवा तुमच्यावर एक दिवस डाव उलटला जाईल. तेव्हा आम्ही पाहू,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या टीका करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.