पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी; 'या' घडामोडी ठरल्या चर्चेचं कारण (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाला भेट देणार आहेत. नुकतेच बुधवारी (४ जुलै) त्यांनी घानाला भेट दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळणे भारतासाठी आणि पंतप्रधान मोदींसाठी अभिमानाची बाब आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये चार स्वातंत्र्य MoU करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.
या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि घानामधील सहकार्य वाढवण्यावर भर दिला. यासाठी दोन्ही देशात चार महत्त्वाच्या सामंजस्य करार करण्यात आले. तसेच या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी निवेदन जारी केली आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की,”भारत आणि घाना दोन्ही देश दहशतवदाला मानवतेचा शत्रू मानतात, यामुळे दोन्ही देश दहशतवादविरोधी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत.” तसेच घानाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर म्हटले की, घानाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणे ही माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी गौरवाची बाब आहे.
I thank the people and Government of Ghana for conferring ‘The Officer of the Order of the Star of Ghana’ upon me. This honour is dedicated to the bright future of our youth, their aspirations, our rich cultural diversity and the historical ties between India and Ghana.
This… pic.twitter.com/coqwU04RZi
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2025