MP Sanjay Raut target modi government over India vs Pakistan asia cup 2025
India vs pakistan : मुंबई : आशिया कप 2025 सुरु असून रविवारी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंचा दारुण पराभव केला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये अशी मागणी देशभरातून केली जात होती. या सामन्यामधून पाकिस्तानला अर्थिक फायदा होईल असे देखील म्हटले जात होते. यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन देखील करण्यात आले. यामध्ये भारतीय खेळाडू विजयी झाले असले तरी भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता असा गंभीर दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. भारत-पाक सामन्यावरुन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, 25 हजार कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहेत. पाकिस्तान हा पैसा भारताच्याविरोधात वापरणार. पैशांसाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता. ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, याकरिता आपण प्रयत्न केली, त्याला सामन्यातून पैसा कमावून दिले. संधी असताना भाजपाने माघार घेतली. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. भारताने सामना खेळून नाचक्की करून घेतलीये. संघाची इच्छा नसताना हा सामना खेळवला गेल्याचे सुनील गावस्कर यांनी काल म्हटले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह
खासदार संजय राऊत म्हणाले की, “काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकले त्याच्याबरोबर 25 महिलांचे कुंकू पुसलेले परत आले का यात भरपाई काय झाली? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली. क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंग मॅच होती कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळायला गेला यात पाकिस्तानला सुद्धा त्याचे पैसे मिळाले असतील. कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले असतील. तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरुद्ध लढण्यासाठी महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काही फरक पडत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाकडून देखील या सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षाकडून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. माझे कुंकू माझा देश असे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून केले जात आहे. तसेच कुंकू देखील सरकारला पाठवले जात आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला विरोध दर्शवला जात आहे.