Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाल्मिक कराड प्रकरणात ED ची कारवाई का नाही? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल, निर्मला सीतारमण यांच्याकडे करणार तक्रार

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येमधील मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा आरोप करत पत्रकार परिषद घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 09, 2025 | 04:25 PM
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मला कधीच वाटलं नव्हतं...'

धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मला कधीच वाटलं नव्हतं...'

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिना झाला आहे. तपास अद्याप सुरु असून अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत. यानंतर आता वाल्मीक कराड याची देखील कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाबाबत आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे दावे केले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. बीड हत्या प्रकरणातील रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भाजप नेते सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी नवीन दावे केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक दावे केले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत देखील चर्चा करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पीएमएलएचा कायदा हा काळा पैसा रोखण्यासाठी आहे. खंडणीचा गुन्हा हा पीएमएलएच्या अंतर्गत येत आहे. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तर मग वाल्मिक कराडवर आतापर्यंत ईडीची आणि पीएमएलए कारवाई का झाली नाही. वाल्मिक कराडच्या नावाने 2022 मध्ये नोटीस काढली होती. त्यानंतर कारवाई झाली नाही. परंतु संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर काहीही पुरावे नसताना कारवाई झाली. तसेच आठ महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून एफआयआर झाला असताना वाल्मिक कराडवर कारवाई का नाही. यासंदर्भात आम्ही अर्थ मंत्रालयाला पत्र देणार आहोत,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे खासदार राऊत म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर तर फक्त कानामध्ये एकाने सांगितलं म्हणून पीएमएलए लावण्यात आला. या संदर्भात आजपर्यंत एकही पुरावा मिळालेला नाही. 28 मे 2024 मध्ये एका कंपनीने केलेल्या एफआयआरमध्ये देखील वाल्मिक कराडचे नाव आहे. तरी देखील कारवाई करण्यात आलेली नाही. कंपनीने एफआयआर केलेला असताना कोणताही ॲक्शन का घेण्यात आलेली नाही? ज्यांच्या विरोधात पुरावे देखील त्यांच्या कारवाई केली जाते,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही. तो सामाजिक विषय आहे. अवधा कंपनीने एक्सक्टार्कशनचा हा गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्यावर ईडी आणि पीएमएलएची कारवाई का नाही? या आधीच त्यांना ईडीची नोटीस असून देखील कारवाई केली जात नाही. मे महिन्यामध्ये तक्रार असताना मे ते डिसेंबर हे आठ महिन्यामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आलेली का नाही?  मग यामध्ये ईडीचा रोल का नाही?” असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल?

पुढे त्या म्हणाल्या की, “संसदेमध्ये या संदर्भात कायदा मंजूर केलेला असताना महाराष्ट्रातील सरकारने वाल्मिक कराडच्या खंडणीबाबतची ही माहिती केंद्र सरकारला दिलेली नाही. ही बाब अर्थ खात्याच्या अंतर्गत येते. ही गोष्ट महाराष्ट्र सरकारने सांगितली नसेल तर मी आणि खासदार बजरंग सोनावणे अर्थखात्याला या संदर्भात पत्र लिहिणार आहे. या संदर्भात बजेट सेशन सुरु झाल्यानंतर मी अर्थमंत्री निर्मिला सीतारमण यांना सांगणार आहे. अशा प्रकारे कंपन्यांकडून खंडणी घेतली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल असे प्रश्न मी अर्थखात्यापुढे मांडणार आहे,” अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

Web Title: Mp supriya sule demands to issue ed for extortion against valmik karad accused in santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh Murder
  • supriya sule
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
1

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?
2

Supriya Sule: महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, कारण काय?

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले
3

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.