
MP Supriya Sule letter to CM Devendra Fadnavis for Solapur drug smuggler joins BJP party
Solpur Drug Smuggler in BJP : सोलापूर: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका असल्यामुळे पक्षप्रवेशांना वेग आला आहे. अनेक स्थानिक लोक पक्षप्रवेश करुन राजकारणाकडे पावले वळवत आहेत. दरम्यान, सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूरमध्ये ड्रग्ज तस्कार भाजपमध्ये (BJP) पक्षप्रवेश करत आहेत. यावरुन विरोधकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
सोलापूरमध्ये भाजपच्या जेष्ठ आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या व्यक्तीचा भाजपमध्ये प्रवेश पार पडला. यासाठी अगदी त्याला पायघड्या घालण्यात आल्या. यावरुन जोरदार राजकारण तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, “तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल.”
प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत.. मा. महोदय,
सप्रेम नमस्कार, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये… — Supriya Sule (@supriya_sule) November 12, 2025
“आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.” असे देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे,” अशा भावना खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या आहेत.