Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

Mumbai MLA Report Card 2026: प्रजा फाउंडेशनच्या ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. अहवालानुसार काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2026 | 12:30 PM
मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ समोर
  • काँग्रेसचे आमदार अव्वल
  • शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब
Mumbai MLA Report Card 2026 News Marathi : मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या ‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’ (Mumbai MLA Report Card 2026) मध्ये मुंबईतील ३३ आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत आमदारांनी विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता, विधिमंडळातील सहभाग, उपस्थिती आणि इतर निकषांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले आहे.

काँग्रेसचे आमदार अव्वल

प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसचेच असलम शेख ८०.५८ गुणांसह दुसऱ्या, तर ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, मूल्यांकन करण्यात आलेल्या मुंबईतील ३३ आमदारांपैकी केवळ या तीन आमदारांनाच ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

आमदारांच्या प्रश्नांची गुणवत्ता घसरली

अहवालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे आमदारांकडून विधिमंडळात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या गुणवत्तेत झालेली घसरण. १२व्या विधानसभेत प्रश्नांच्या गुणवत्तेचा सरासरी स्कोअर ५० टक्के होता. तो १५व्या विधानसभेत अवघ्या ३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यावरून मुंबईच्या प्रश्नांबाबत विधिमंडळात होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता आणि आमदारांकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रश्नांच्या संख्येत तब्बल ७२ टक्के घट

केवळ प्रश्नांची गुणवत्ताच नव्हे, तर आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. १५व्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत मुंबईतील ३३ आमदारांनी एकूण २,२१३ प्रश्न विचारले. याउलट, १२व्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१० या समान कालावधीत ७,९५५ प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच प्रश्नांच्या संख्येत सुमारे ७२ टक्के घट झाली आहे.

आमदारांच्या एकूण सरासरी गुणांतही घट

मुंबईतील ३३ आमदारांचा १५व्या विधानसभेतील एकूण सरासरी स्कोअर ५५ इतका आहे. १२व्या विधानसभेत हाच सरासरी स्कोअर ६१ होता. त्यानंतर १४व्या विधानसभेत तो ५४ पर्यंत घसरला होता. १५व्या विधानसभेत तो ५५ वर पोहोचल्याने किरकोळ सुधारणा दिसून आली असली, तरी १२व्या विधानसभेच्या तुलनेत कामगिरी अजूनही कमी आहे.

मुंबईतील आमदारांचे सरासरी वयही वाढले

अहवालातून आणखी एक महत्त्वाचा कल समोर आला असून गेल्या काही विधानसभांमध्ये मुंबईतील आमदारांचे सरासरी वय वाढताना दिसत आहे.

१२वी विधानसभा – ५२ वर्षे
१३वी विधानसभा – ५१ वर्षे
१४वी विधानसभा – ५३ वर्षे
१५वी विधानसभा – ५७ वर्षे

त्यामुळे सध्याच्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांचे सरासरी वय गेल्या चार विधानसभांमधील सर्वाधिक असल्याचे या आकडेवारीवरून दिसते.

कोणत्या निकषांवर झाले मूल्यांकन?

प्रजा फाउंडेशनने आमदारांची क्रमवारी ठरवताना केवळ त्यांनी किती प्रश्न विचारले एवढाच निकष विचारात घेतलेला नाही. प्रश्नांची संख्या आणि गुणवत्ता, विधिमंडळाच्या कामकाजातील सहभाग, उपस्थिती तसेच इतर कामगिरीविषयक निकषांचा समावेश करून एकूण गुण निश्चित करण्यात आले आहेत.

एकूणच, ‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, असलम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी आघाडी घेतली असली, तरी मुंबईतील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या ७२ टक्क्यांनी घटणे आणि प्रश्नांच्या गुणवत्तेचा सरासरी स्कोअर ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत घसरणे, या बाबी विधिमंडळातील मुंबईच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.

कोणता आमदार कोणत्या क्रमांकावर?

‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांनी पहिले तीन क्रमांक पटकावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दोन आमदारांनी टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे सुनील प्रभू चौथ्या क्रमांकावर, तर भायखळा विधानसभा मतदारसंघाचे मनोज जामसुतकर पाचव्या क्रमांकावर आहेत. वरळीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे १८व्या स्थानावर आहेत.

दुसरीकडे, रिपोर्ट कार्डच्या तळाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार दिसत आहेत. प्रकाश सुर्वे ३३व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर, तर शिवसेनेचे अशोक पाटील ३२व्या क्रमांकावर आहेत. घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम ३१व्या स्थानावर आहेत.

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

Web Title: Mumbai mla report card 2026 praja foundation congress mlas top ranking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र
1

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती
2

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
3

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
4

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.