Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Bhuleshwar Raja Accident : मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’ या २७ फूट उंच गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मूर्ती पूर्णपणे सुकलेली नसल्याने आणि वेल्डिंगचे काम बाकी असल्याने ती १० दिवसांनी नेण्याचा सल्ला दिला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2026 | 12:30 PM
'अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी...', ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

'अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी...', ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Follow Us
Follow Us:
  • ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण
  • दुर्घटनेत दोन जीव गेले
  • ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेचा उलगडा?
 

Bhuleshwar Raja Accident : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या मुंबईला शनिवारी (22 ऑगस्ट 2026) संध्याकाळी हादरवून सोडणारी दुर्घटना घडली. ‘भुलेश्वरचा राजा’ या २७ फूट उंच भव्य गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मूर्ती क्रेनवरून अचानक खाली कोसळली. या दुर्घटनेत भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला. दोन लहान मुलींसह पाच जण जखमी झाले. आता या दुर्घटनेमागील कारणांबाबत नवी माहिती समोर येत असून, मूर्तिकाराने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

रविवारी (23 ऑगस्ट 2026) शोकाकुल वातावरणात संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे या दुर्घटनेची चौकशी सुरू असून नेमकी चूक कुठे झाली, याचा शोध घेतला जात आहे.

मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

मंडपापासून अवघ्या ५० फुटांवर दुर्घटना

भायखळा येथील गणेशमूर्ती कार्यशाळेतून ‘भुलेश्वरचा राजा’ या भव्य गणेशमूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात सुरू झाला होता. मिरवणूक भुलेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर मंडप अवघ्या काही अंतरावर राहिला असतानाच दुर्घटना घडली. मंडपापासून सुमारे ५० फूट अंतरावर असताना मूर्ती अचानक कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दुर्घटनेच्या काही सेकंद आधीच मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे यांनी एका माजी नगरसेवकासोबत फोटो काढला होता. त्यानंतर काही क्षणांतच मूर्ती कोसळल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

थायलंडमधील गणेशमूर्तीपासून प्रेरणा

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिरातील गणेशमूर्तीपासून प्रेरणा घेऊन ‘भुलेश्वरचा राजा’ची यंदाची २७ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली होती. भायखळा येथील मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी ही मूर्ती तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाची मूर्ती वेगळ्या स्वरूपाची असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांमध्येही मोठा उत्साह होता.

‘मूर्ती पूर्ण सुकलेली नाही, १० दिवसांनी न्या’

या दुर्घटनेनंतर आता एक महत्त्वाचा दावा समोर आला आहे. वृत्तानुसार, मूर्ती पूर्णपणे सुकलेली नसल्याने ती अद्याप ओलसर होती. तसेच काही वेल्डिंगचे कामही पूर्ण होणे बाकी होते. त्यामुळे मूर्ती आणखी सुमारे १० दिवस कार्यशाळेतच ठेवावी आणि त्यानंतर आगमनासाठी घेऊन जावी, असा सल्ला मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इंदूरहून येणाऱ्या डेकोरेटरच्या नियोजनामुळे मूर्ती लवकर मंडपात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित डेकोरेटर २९ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार असल्याने त्यापूर्वी मूर्ती मंडपात आणण्याची घाई करण्यात आले, असं देखील समोर आलं. या दाव्यांची अधिकृत चौकशीतून पुष्टी होणे बाकी आहे.

प्रवासातच मिळाले होते धोक्याचे संकेत?

मूर्तीच्या आगमन प्रवासादरम्यान सुरुवातीलाच गणपतीच्या गळ्यातील हार निसटला होता. त्याचबरोबर मूर्तीच्या पाठीमागील वेल्डिंगचा काही भागही तुटला होता. भुलेश्वर परिसरात आल्यानंतर पुन्हा हार निसटला आणि त्यानंतर अचानक वेल्डिंग तुटल्याने सुमारे दोन टन वजनाची मूर्ती खाली कोसळली. या घटनाक्रमाची चौकशी यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी होणे महत्त्वाचे आहे. मूर्ती कोसळण्यामागे वेल्डिंगमधील त्रुटी होती, मूर्ती ओलसर असल्यामुळे संरचनेवर अतिरिक्त ताण आला की अन्य काही तांत्रिक कारण होते, हे तपासानंतर स्पष्ट होईल.

मूर्ती सावरण्याच्या प्रयत्नात दोघांचा मृत्यू

मूर्ती कोसळत असल्याचे लक्षात येताच संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांनी ती सावरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अवजड मूर्तीचा भाग त्यांच्या अंगावर कोसळल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली. संकेत नेवशे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. ब्रिजेश जोशी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन लहान मुलींसह अन्य पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे.

चौकशीनंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार

या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. मूर्तीच्या वाहतुकीपूर्वी तिची संरचनात्मक सुरक्षितता तपासण्यात आली होती का, वेल्डिंगचे काम कितपत पूर्ण झाले होते, क्रेन आणि इतर यंत्रणेचा वापर योग्य पद्धतीने झाला का, तसेच मूर्तिकाराने मूर्ती नेण्यास मनाई किंवा विलंब करण्याचा सल्ला दिला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मूर्तिकाराच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा सध्या समोर येत असला तरी त्याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे दुर्घटनेमागील जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबईचा राजा मंडळाकडून आर्थिक मदत

‘मुंबईचा राजा’तर्फे ‘भुलेश्वरचा राजा’ मंडळाकडे तीन लाख रुपयांचा आधार निधी सुपूर्द करण्यात येत आहे. या संकटातून सावरण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहो,” असंही गणेश गल्लीच्या (मुंबईचा राजा) मंडळाच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा …

Web Title: Bhuleshwarcha raja 27 feet ganesh idol collapse mumbai two dead sculptor warning ignored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Ganpati Festival
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
1

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
2

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
3

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
4

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.