Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Dahisar Accident: दहिसर टोल नाक्याजवळील गोदावरी लॉजसमोर सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत १४ वर्षीय सौरभ विश्वकर्माचा जागीच मृत्यू झाला. शाळेतून वडिलांसोबत घरी जात असताना हा अपघात घडला. दुर्घटनेत सौरभचे वडीलही जखमी झाले असून, काशिमीरा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2026 | 04:50 PM
शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • दहिसर टोल नाक्याजवळ भीषण अपघात
  • सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
  • वडिलांसोबत दुचाकीवरून जाताना अनर्थ
विजय काते, मिरा रोड : दहिसर टोल नाक्याजवळ गोदावरी लॉजसमोर सोमवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव असून, तो आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत सौरभच्या वडिलांनाही दुखापत झाली आहे.

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ विश्वकर्मा हा शाळा सुटल्यानंतर आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात होता. दहिसर टोल नाक्याजवळील गोदावरी लॉजसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी सौरभचे डोके ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा गंभीर अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, आरसीसी प्लांटसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा आणि त्यांच्या चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत आहे का, याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांकडून वेगमर्यादा, सुरक्षित अंतर आणि वाहतूक नियमांचे पालन न झाल्यास अशा दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.

या अपघातामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या १४ वर्षांच्या सौरभचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास काशिमीरा पोलीस करत असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याबाबत तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर 

Web Title: 14 year old boy killed in cement mixer truck accident near dahisar toll naka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Accident
  • Dahisar
  • Mumbai

संबंधित बातम्या

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती
1

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
2

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
3

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये
4

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.