Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले

वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासाठी महाजनकोने ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून हा महागडा कोळसा खरेदी केल्यास वीजेचे दरही वाढतील, त्यामुळे हे टेंडरच रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 07:27 PM
Nana Patole

Nana Patole

Follow Us
Follow Us:
  • नाना पटोले यांची भाजप सरकारवर टीका
  • महागाईसंदर्भात भाजप सरकारवर ओढले ताशेरे
  • पंतप्रधानांकडून GDP चे खोटे आकडे प्रस्तुत केल्याचा दावा
 

मुंबई : “भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात जास्त महागाई महाराष्ट्रात आहे आणि आता वीज दरवाढीचा शॉक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासाठी महाजनकोने ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून हा कोळसा मोदी-शाह यांच्या मित्रोंच्या खाणीतून घेतला जाणार आहे. हा महागडा कोळसा खरेदी केल्यास वीजेचे दरही वाढतील, त्यामुळे हे टेंडरच रद्द करा,” अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, “आम्ही मागील आठवड्यात कोळशाचा मुद्दा उपस्थित केला होता आता सरकारने आणखी एक टेंडर काढले आहे. ३० लाख मेट्रीक टन कोळशाचे हे टेंडर आहे. आपण WCL कडून चांगल्या प्रतीचा व कमी दरातील कोळसा खरेदी करत होतो, हाच कोळसा गुजरात व कर्नाटकला सुद्धा जातो पण पंतप्रधानांच्या मित्रोंला फायदा पोहचवण्यासाठी हे टेंडर काढले आहे. टेंडरमध्ये स्पर्धा असेल तर कमी दरात कोळसा खरेदी करता येतो व त्याचा फायदा जनतेला होतो, पण आता ही स्पर्धाच ठेवली नसून थेट खास व्यक्तीच्या खाणीतून हा कोळसा खरेदी केला जाणार आहे.”

“स्पर्धा संपल्याने महागडा व कमी दर्जाचा कोळसा घ्यावा लागणार आहे. कोल वॅाशरीकडे ५ लाख मेट्रीक टन कोळसा पडून आहे, तो कोळसा सरकार का घेत नाही. सरकार महाग व कमी दर्जाचा कोळसा खरेदी करणार व नंतर वीजेचे दर वाढणार, ही जनतेची लूट आहे. ती थांबली पाहिजे यासाठी हे टेंडर रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले पत्र

यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील ३३ मोठे उद्योग बाहेर गेले आहेत, त्याला कारण महाराष्ट्रातील महागडी वीज आहे. गुजरात व कर्नाटकात आपल्यापेक्षा कमी वीज दर आहेत. उद्योग राज्याबाहेर गेल्याने त्याचा फकटा आपल्याला बसतो, बेरोजगारीत वाढ झाली आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

पंतप्रधानांकडून GDP चे खोटे आकडे

“देशाचा GDP ७.८ टक्के असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक VDO सोशल मीडीयावर टाकून केला आहे. पण पंतप्रधानांनी सांगितलेला GDP चा दर खोटा असल्याचे या विषयातील तज्ञच सांगत आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेती संकटात आहे मग GDP वाढला कसा? असा प्रश्न उपस्थित करत खोटे आकडे सांगून पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Web Title: Nana patole criticizes bjp govt over coal tender to private coal mining companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • BJP Government
  • Nana patole
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले
1

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
2

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू
3

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
4

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.