Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

राहुल गांधी यांच्या विरोधात हा एफआयआर हल्द्वानीमधील शुद्धीकरण वादाच्या संदर्भात दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाल्मिकी समाजातील एका व्यक्तीने काँग्रेस नेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 01, 2026 | 01:36 PM
Rahul Gandhi FIR, Congress Dehradun Protest, Pushkar Singh Dhami

Rahul Gandhi FIR, Congress Dehradun Protest, Pushkar Singh Dhami

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींवरील FIR विरोधात डेहराडूनमध्ये काँग्रेसचा सचिवालयावर मोर्चा.
  • निदर्शने रोखताना काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झाली झटापट.
  • हल्द्वानी येथील धार्मिक कार्यक्रमासंदर्भातील वक्तव्यावरून एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा.
Protest Against Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवरून उत्तराखंडमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मंगळवारी, एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये पुष्कर सिंग धामी सरकारविरोधात मोर्चा काढसचिवालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

डेहराडूनमध्ये भाजप आणि धामी सरकारविरोधात आंदोलन करताना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला एफआयआर मागे घेण्याची मागणी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी संविधान आणि देशाचा कायदा काय सांगतो तेच सांगितले आहे आणि त्यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे.

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला?

राहुल गांधी यांच्या विरोधात हा एफआयआर हल्द्वानीमधील शुद्धीकरण वादाच्या संदर्भात दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाल्मिकी समाजातील एका व्यक्तीने काँग्रेस नेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका व्यक्तीने आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यक्रमाच्याच ठिकाणी आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमाला जातीशी जोडले आहे.

भाजपविरोधात काँग्रेसची आघाडी

या वादावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर मंचाच्या शुद्धीकरणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु आजपर्यंत एकही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. विरोधाभास म्हणजे, जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा अस्पृश्यता आणि भेदभावाशी जोडून याला दलित समाजाचा अपमान म्हटले, तेव्हा त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

“न्यायाची मागणी करणे हा गुन्हा आहे का? असा सवालही सचिन पायलट यांनी उपस्थित केल.  तसेच,  एफआयआर आणि खटल्यांच्या दबावाखाली आवाज दाबला जाऊ शकत नाही. भाजपचा दलितविरोधी चेहरा उघड झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय, समानता आणि संविधानासाठी आवाज उठवत राहतील.” असंही त्यांनी नमुद केलं.

हल्द्वानी में कांग्रेस अध्यक्ष @Kharge जी के भाषण के बाद सभास्थल के हुए “शुद्धिकरण” के खिलाफ FIR दर्ज कराने के लिए कई प्रयास किए गए, लेकिन आज तक FIR दर्ज नहीं हुई। वहीं, विडंबना देखिए— इस मुद्दे को छुआछूत और भेदभाव से जोड़कर नेता प्रतिपक्ष @RahulGandhi जी ने इसे दलित समाज का… https://t.co/WklKqqZ235 — Sachin Pilot (@SachinPilot) August 31, 2026

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

अखिलेश यादव यांचाही हल्ला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत म्हटले, “भाजपच्या दलितविरोधी मानसिकतेमुळेच उत्तराखंडमध्ये गोंधळ झाला आणि विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाला. हे अत्यंत निंदनीय आहे.” भाजपने स्वतःच्या पराभवाच्या प्रमाणपत्रावर सही केली आहे.

धामींनी राहुल गांधींना प्रत्युत्तर

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, चहा पार्टीदरम्यान त्यांना केवळ आपुलकी दिसली, जात नाही. धामींनी राहुल गांधींवर प्रत्येक गोष्टीत जात आणि भेदभाव शोधण्याचा आरोप केला आणि याला त्यांचे संकुचित राजकारण म्हटले.

 

Web Title: National newscongress protest in dehradun against fir on rahul gandhi in uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
1

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
2

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल
3

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
4

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.