Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Municipal Election 2026 : नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Navi Mumbai Election: नवी मुंबई महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा ऐरोली येथे पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन केले

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 13, 2026 | 11:10 AM
वी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

वी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी, मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी
  • भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी जिंकून देण्याचे आवाहन
  • मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा ऐरोली येथे पार पडली
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबईच्या सर्व मागण्या पूर्ण करून नवी मुंबईला काहीही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी आहे, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.नवी मुंबई महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा ऐरोली येथे पार पडली. याप्रसंगी वनमंत्री नामदार गणेश नाईक केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे,माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक , माजी आमदार सुभाष भोईर आरपीआयचे सिद्राम ओव्हाळ महेश खरे बंजारा समाजाचे महंत बाबू सिंग महाराज आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

भाजपाच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास असाच सुरू राहावा अशी येथील जनतेची इच्छा असल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे नवी मुंबईचे अनेक प्रश्न सुटल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वीस वर्षे मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वाढवणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. नवी मुंबईची पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशिर धरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. नवी मुंबई परिवहन सेवा, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा उत्तम असल्याचे सांगून गाव गावठाण शहर आणि झोपडपट्ट्यांचा नियोजनबद्ध विकास करणार असल्याचे नमूद केले.

नामदार गणेश नाईक नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे आणि समता प्रस्थापित करणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री आठवले यांनी काढले. राज्य सरकारमार्फत नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असून देशातले विकसित शहर म्हणून नवी मुंबई उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नवी मुंबई विमानतळामुळे एमएमआर रीजनमध्ये नवी मुंबई विकासाचे ग्रोथ इंजिन बनत आहे. येथील भूमिपुत्रांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात येतील. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून झोपडपट्टी बांधवांना मालकी हक्क देण्यात येईल. सिडकोची बांधकामे फ्रीहोल्ड करू. नवी मुंबईला मुंबईशी मेट्रो आणि वॉटर ट्रान्सपोर्ट ने जोडण्यात येईल. नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि बा पाटील यांच्या नावानेच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व लोकल गाड्या वातानुकूलित करणारा असून सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये मात्र कोणतीही वाढ करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.

नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशिर धरणाचे काम सुरू झाले असून येत्या चार वर्षात ते पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. नवी मुंबईतील नागरी सुविधांच्या जागा महापालिकेला देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. घणसोली सिम्पलेक्स वसाहतीचा पुनर्विकास करू. एपीएमसी मार्केट दुसरीकडे कुठेही हलवणार नाही तर याच ठिकाणी सुविधायुक्त एपीएमसी निर्माण करण्यात येईल. गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईचा विकास झाला असून तब्बल 26 पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी या शहराला गौरवल्याचे त्यांनी नमूद केले. नवी मुंबईचे काम कुठेही आडणार नाही असे सांगून नवी मुंबईच्या विकासात कोणताही अडथळा येऊ देणार नाही असे वचन त्यांनी दिले. कमळाचे बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला

Web Title: Navi mumbai municipal corporation elections 2026 a grand rally of chief minister fadnavis was held today in airoli to support the bjp candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • devendra fadnavis
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार
1

Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
2

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
3

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला
4

Political News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी; मतदानाला ३ दिवस उरले असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार गळाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.