Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत, त्यांच्या कामाचा वेग अफाट; शरद पवारांकडून कौतुकाचा वर्षाव

‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी राजकीय कामाकाज आणि कार्याचे कौतुक केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 22, 2025 | 06:09 PM
मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज 55 वा वाढदिवस असून त्यांना राज्यासह देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील विविध नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. यामध्ये शरद पवार यांनी फडणवीसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. शरद पवार यांनी लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक मी पाहिला आहे. त्यांचे काम पाहिले की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धींगत होत राहो, अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे लिहिले आहे की, देवेंद्र फडणीस हे कायद्याचे पदवीधर असल्याचे पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती, अशी स्तुतीसुमने शरद पवारांनी वाहिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उद्धव ठाकरेंही केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लेख लिहिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील देवेंद्र फडणवीसांचे जोदार कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी लिहिले आहे की, गंगाधर फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदर्श राजकारणी म्ह्णून आपली प्रतिमा निर्माण केली होती. त्यांचा वारसा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे अत्यंत मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१४ ते २०१९ या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या कालावधीत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची त्यांची धडपड पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य त्यांच्या पक्षाला उपयुक्त ठरेल. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांमध्ये यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!, असे उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

Web Title: Ncp sharad pawar appreciate cm devendra fadnavis birthday political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
1

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
3

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
4

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.