Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद…’ राष्ट्रवादी शरद पवार गटाची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले होते. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी गोपीचंद पडळकरांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 13, 2026 | 09:53 PM
Ravikant Varpe slams Gopichand Padalkar

Ravikant Varpe slams Gopichand Padalkar

Follow Us
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले होते. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी गोपीचंद पडळकरांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हंटले कि, “केवळ नाटक करण्यापुरतं आमदार रोहित पवारांचं आंदोलन आहे. कशी ऍक्टिंग करायची हे रोहित पवारांना चांगलं माहिती आहे. तसेच असलं शेतकऱ्यांच्या कोरड्या कळवळ्याचे नाटक कशाला करताय? हे चित्रपटाचे शूटिंग आहे का? नटरंग चित्रपटाचे शूटिंगची एक्टिंग करायला गेला आहे का ?” अशा परखड शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावावर टीका केली आहे. आता यावरून रविकांत वर्पे यांनी आपल्या ‘x’ अकाऊंटवरून पोस्ट करत चांगलीच आगपाखड केली आहे.

काय म्हणाले रविकांत वर्पे?

रविकांत वर्पेनी “अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद” म्हणत पडळकरांना टोला मारला आहे. आपल्या पोस्ट मध्ये ते लिहितात, “राज्यात सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जमाफीवर सरकार स्पष्ट बोलण्यास तयार नाही. विकतच्या डिझेलसाठीदेखील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस रांगा लावाव्या लागतात. खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या आया बहिणींनाही आता तुम्ही रस्त्यांवर रांगा लावण्यास भाग पाडलं आणि तरीही स्वतःच्या सरकारला जाब विचारायचं सोडून तू फिरून फिरून रोहितदादांच्या साखर कारखान्यांवर येतोस. त्यांनी कष्टातून व्यवसाय उभा केलाय. त्यांनी साखर कारखान्याद्वारे हजारो रोजगार उपलब्ध केले. विविध संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे उभारले आणि तू काय केलंस…?”

अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद… राज्यात सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जमाफीवर सरकार स्पष्ट बोलण्यास तयार नाही. विकतच्या डिझेलसाठीदेखील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस रांगा लावाव्या लागतात. खत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या आया बहिणींनाही आता तुम्ही रस्त्यांवर रांगा लावण्यास भाग… pic.twitter.com/czGVeV5FVG — Ravikant Varpe रविकांत वर्पे (@ravikantvarpe) June 13, 2026


ते पुढे म्हणाले,”धर्माचा बाजार मांडलास आणि स्वतःचे खिसे भरलेस…काही दिवसांनी येणाऱ्या सण-उत्सवांमध्ये डीजेच्या ऐवजी तुलाच वाजवायला नेतील. तु फुकटचा तोंडाचा पट्टा चालवतोस आणि रोहितदादा रोजगाराचा… यामुळे तोंडाचा पट्टा चालवणं सोपं असतं; पण सहकाऱ्यांसाठी, मायबाप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, अन्नत्याग करणे हे सोपं नसतं… अरे रे रे… विसरलोच… त्याग आणि तुझा तसा काय संबंध रे…? तू हल्ली ५६ भोग खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसतोस, यामुळे तुला शेतकऱ्यांच्या मीठ भाकरीची काय चव राहणार आणि काय तुझं इमान राहणार…”

ते पुढे म्हणाले, “तू ज्यांच्याशी इमानदार आहेस त्यांची टिमकी वाजव… निवडणूक आली की माय बाप शेतकरी म्हणून रस्त्यांवर तोंडाचा पट्टा वाजव… आमदारकी आली की भाजपमधील वरिष्ठांसमोर त्यांनी तुझ्या पायात बांधलेलं घुंगरू वाजव… त्यामुळे शेवटी पुन्हा म्हणावसं वाटतं, अरे गोपीचंद… काय रे तुझा छंद…” असे म्हणत त्यांनी शेलक्या शब्दांत पडळकरांवर टीका केली.

‘सरसकट कर्जमाफीशिवाय सरकारकडे पर्याय नाही,’ बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

रोहित पवारांना आव्हान Dयेत पडळकर म्हणाले की, “जोपर्यंत साखर कारखान्याने एफआरपी दिलेली नाही ती एफआरपी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसलं पाहिजे, अन्नत्याग केला पाहिजे, सोलापूर एसपी साहेबांना माझी विनंती आहे. पोलीस प्रोटेक्शन रोहित पवारांच्या बाजूला लावा, त्याला एक अन्नाचा घास सुद्धा खाऊ देऊ नका, नुसत्या बातमीपुरत, नाटक करण्यापुरतं, रोहित पवाराचं हे आंदोलन आहे, ते होता कामा नये. रोहित पवारांनी व पवार कुटुंबांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात म्हणजे ६ कोटीपासून यांनी ढापलेत. जे कारखाने 100 ते 200 कोटीचे कारखाने कशाला ढापले ?तुम्ही हे नाटक करताय हे काय पिक्चरच शूटिंग चालू आहे का?” असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Web Title: Ncp sharad pawar spokesperson ravikant varpe slams gopichand padalkar over remarks on rohit pawar hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपूरात जाऊन करणार उपोषण
1

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपूरात जाऊन करणार उपोषण

‘सरसकट कर्जमाफीशिवाय सरकारकडे पर्याय नाही,’ बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
2

‘सरसकट कर्जमाफीशिवाय सरकारकडे पर्याय नाही,’ बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका
3

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Sadabhau Khot on Rohit Pawar: १०० उंदीर खाऊन मांजर हजला चालली; रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनावर सदाभाऊ खोतांचा घणाघाती वार
4

Sadabhau Khot on Rohit Pawar: १०० उंदीर खाऊन मांजर हजला चालली; रोहित पवारांच्या पंढरपूरमधील आंदोलनावर सदाभाऊ खोतांचा घणाघाती वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.