ncp yugendra pawar Engagement in Mumbai political news
Yugendra Pawar Sakharpuda : मुंबई : यंदा पवार कुटुंबामध्ये लगीन घाई दिसून येत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला आहे. मुंबईमध्ये पवार कुटुंबाचा हा कौटुंबिक सोहळा पार पडला आहे. युगेंद्र पवार यांचा तनिष्का कुलकर्णीसोबत साखरपुडा संपन्न झाला आहे. यावेळी अजित पवार व शरद पवार हे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा देखील साखरपुडा झाला होता. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडला. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबामध्ये दोन लग्ने होणार असल्याचे दिसले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये साखरपुडा पार पडला होता. या सोहळ्यावेळी पवार कुटुंब एकत्र आलेले दिसून आले होते. जय पवार यांच्या साखरपुड्याला सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. तसेच शरद पवार हे देखील तेव्हा उपस्थित होते. तेव्हा अजित पवार स्वतः शरद पवार यांचे स्वागत करायला गेले होते. यावेळी देखील युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याला पवार कुटुंब एकत्र आल्याचे दिसून आले आहे. राजकीय विरोध असताना देखील पवार कुटुंबामध्ये ही एकता दिसून येत आहे.
मुंबईतील प्रभादेवी येथील इंडिया बुल्स इमारतीत आज 3 ऑगस्ट रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे. यावेळी पवार कुटुंब एकत्र आले. इंडिया बुल्स बिल्डिंग हे तनिष्का कुलकर्णी यांचे निवासस्थान असून, या ठिकाणी हा समारंभ साजरा झाला. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बारामतीच्या बहुप्रतिष्ठित आणि बहुचर्चित विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार हे चर्चेत आले होते. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार हे उभे राहिले होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये युगेंद्र पवार हे जोरदार चर्चेत आले होते. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत दिसून आली. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार लढले होते. मात्र अजित पवार यांचा निवडणुकीमध्ये विजय झाला. निवडणुकीमध्ये एकमेकांविरोधात उभे राहिलेले अजित पवार आणि युगेंद्र पवार हे एकत्रित आले आहेत. युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याला अजित पवारांनी देखील उपस्थिती लावली आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवत पवार कुटुंब एकत्र आल्याचे दिसून आले.