उपराष्ट्रपतीसाठी संघाचा दबाव
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अशातच भाजपला या पदासाठी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी द्यायची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची भाजप पार्श्वभूमी आहे. शिवाय, ते संघाच्याही जवळचे मानले जातात.
भाजप नेतृत्वाने त्यांच्या पसंतीनुसार जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतिपदावर आणले होते. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतिपद हे रिक्त झाले आहे. अशा परिस्थितीत, भाजपने संघाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला या पदावर आणावे. भाजपवर अशा व्यक्तीचे नाव पुढे करण्याचा दबाव आहे, जो संघाची पसंती देखील असेल. त्यात जे. पी. नड्डा यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार शोधणे अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर भाजपवर उमेदवाराबाबत दबाव वाढत आहे. भाजप नेतृत्वाला त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीची या पदावर निवड व्हावी, अशी अपेक्षा आहे.
नड्डा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत केलं काम
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार असू शकत नाही. अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे त्यांच्या नामांकनात कोणताही अडथळा नाही.
विरोधकांशी चांगले संबंध
विरोधी पक्षांशीही चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत, ते विरोधकांसोबतच्या सर्व प्रकारच्या गतिरोधांना संपवण्यात प्रभावी ठरतील. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून ओम माथूर, थावरचंद गेहलोत तसेच शरद पवार यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. जर शरद पवार यांना काही प्रमाणात पटवून दिले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे भाजप नेतृत्वाचे मत आहे.
हेदेखील वाचा : Yugendra Pawar Sakharpuda : यंदा पवार कुटुंबामध्ये लगीनघाई! युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न