
'बिहार निवडणुकीत एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल'; अमित शहांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दावा केला आहे. त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए 160 हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
बिहार निवडणुकीच्या पोस्टर्समधून लालू यादव यांचा फोटो वगळल्याबद्दल अमित शाह यांनी महाआघाडीवर निशाणा साधला. त्यांनी महाआघाडीला लालू यादव यांचा फोटो का वगळला असे म्हणत टीका केली. ते म्हणाले, ‘आम्ही आमच्या नेत्यांचा सन्मान करतो. आमच्या पोस्टर्सवर असे बरेच लोक आहेत जे निवडणूक लढवत नाहीत, तरीही आम्ही त्यांना समाविष्ट करतो. पण, महाआघाडी असं करताना दिसत नाही. त्यांनी त्यांच्या आघाडीतील नेत्याचा फोटोच लावला नाही’.
दरम्यान, बिहार निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना उभे न करण्याच्या प्रश्नाबाबत अमित शाह म्हणाले की, एनडीएकडून चार मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातच आमच्याकडून प्रभावी उमेदवारांनाच तिकीट दिले जाते, असे म्हणत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसवरही साधला निशाणा
यादरम्यान, अमित शहांना राहुल गांधी यांच्या विधानाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, या विधानांचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. जेव्हा-जेव्हा पंतप्रधान मोदींविरुद्ध अपशब्द वापरले गेले आहेत मणिशंकर अय्यर ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत तेव्हा भाजपने अधिक जोरदार विजय मिळवला आहे. यावेळी काँग्रेस नेत्याने अनेकांचा अपमान केला आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोकामा घटनेमुळे नुकसान होणार?
मोकामा घटनेमुळे नितीश सरकारच्या जंगलराजवर हल्ला करण्याच्या प्रतिमेला धक्का बसेल का? यावर अमित शहा म्हणाले की, कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत एकही घटना घडणार नाही, असे म्हणता येणार नाही. जेव्हा एखाद्या घटनेनंतर कायदा माणसाच्या शक्तीनुसार चालतो तेव्हा जंगलराज पसरतो.
हेदेखील वाचा : Bihar Election Survey 2025: बिहार निवडणुकीचे काय असतील निकाल? तीन दिग्गजांची भविष्यवाणी