बिहार निवडणुकीचे काय असतील निकाल? तीन दिग्गजांची भविष्यवाणी
Bihar Election Survey 2025: देशाचे लक्ष सध्या बिहारकडे लागले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी येत्या काही दिवसांतच बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. पण त्यापूर्वीच बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्याचवेळी बिहारमधील स्थानिक पक्षांमध्येही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड यांसह अनेक स्थानिक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल आहेत.
दुसरीकडे बिहारमध्ये निवडणुका झाल्यास कोणता पक्ष जिंकेल, आपली सत्ता स्थापन करू शकतो, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या सगळ्यात सर्वेक्षण कंपन्यांमधील तीन तज्ज्ञांनी बिहार निवडणुकीवर त्यांची मत मांडली आहेत. सीव्होटर फाउंडेशनचे संस्थापक यशवंत देशमुख, व्होटव्हायबचे संस्थापक भागीदार अमिताभ तिवारी आणि अॅक्सिस माय इंडियाचे अध्यक्ष प्रदीप गुप्ता यांनी बिहार निवडणूक विश्लेषण केले.
Bihar Politics: ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय..; बिहारच्या बड्या नेत्याचा आरोपाने खळबळ
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना यशवंत देशमुख यांनी बिहार निवडणुकांवर भाष्य केलं आहे. “उत्तर प्रदेशातील मुस्लिम-यादव समीकरण बिहारमधील आरजेडीसारखेच आहे, परंतु अखिलेश यादव यांनी पीडीए प्लसचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. तेजस्वी बिहारमध्ये हा प्रयोग कसा राबवू शकतात हे पाहणे बाकी आहे. नितीश कुमारशिवाय बिहारमध्ये कोणीही का जिंकू शकले नाही, यामागचे कारण म्हणजे, नितीश कुमार यांच्याकडे त्यांची स्वतःची व्होट बँक आहे.”
व्होटव्हायबचे अमिताभ तिवारी म्हणाले, “बिहार हे एक अवघड राज्य आहे. येथील अनेक लहान-मोठे पक्ष स्वतःची व्होट बँक तयार करूनही काम करत असतात हे फक्त तीन प्रमुख पक्ष नाहीत आणि निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये एकाच जातीच्या उमेदवारांनी १०५ जागा जिंकल्या आहेत. बिहारमधील तरुण मतदार एनडीए सोडून तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांच्यात विभागले जात असल्याचे दिसत येत आहे. शिक्षणाला मुद्दा बनवून प्रशांत तरुण मतदारांमध्ये तेजस्वी यांच्यापेक्षा आघाडी मिळवू शकतात.”
Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा
प्रदीप गुप्ता यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे वर्तणूक आणि निवडणूक निकालांविषयी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, “निवडणूक निकालांचा अंदाज लावणे म्हणजे कोण सरकार बनवेल, हे सांगणे कठीण आहे. सध्या बिहारच्या मतदारांनाही कोणाला मतदान करायचे हे स्पष्ट नाही. आम्ही २०२४ मध्ये एनडीएच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता.”
जातीय घटकांबाबत ते म्हणाले, “बिहारमध्ये जात अत्यंत प्रासंगिक आहे. येथील सर्व सहा प्रदेशांमध्ये मुस्लिम-यादव लोकसंख्या सुमारे २७ टक्के आहे आणि ही मतपेढी आरजेडीच्या बाजूने एकत्र आली आहे. प्रशांत किशोर यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “ते या निवडणुकीत पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. तरुण आणि महिला घटकांसह, ते काही विशेष जातींच्या प्रतिनिधी देखील आहेत.” गुप्ता यांच्या या विधानातून निवडणूक प्रक्रियेत जातीय आणि महिला घटक किती निर्णायक ठरू शकतात.