Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबाबत माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काही बातम्या माझ्या निदर्शनास आल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 01, 2026 | 01:18 PM
NCP President : 'माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही'; प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

NCP President : 'माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही'; प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे मुंबईहून बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना त्यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात झाला. त्यांच्या आकस्मित जाण्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? याची चर्चा सुरु आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केल्याचे वृत्त समोर येत होते. यावर स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले. 

प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबाबत माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काही बातम्या माझ्या निदर्शनास आल्या आहेत. मी हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छितो की, या बातम्या पूर्णपणे निराधार असून, त्यात काहीही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी आणि आमदारांशी सल्लामसलत केली जाईल, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना व सामूहिक इच्छेचा आदर केला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष असल्याने, आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचे पालन करतो’, असे म्हणत पटेल यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

I have noted few reports circulating in the media regarding my appointment as the National President of the Nationalist Congress Party. I wish to state with absolute clarity that these reports are totally baseless and lack any truth. ​The Nationalist Congress Party is a… — Praful Patel (@praful_patel) February 1, 2026

दरम्यान, अजित पवारांचे विश्वासू नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खातं, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

सुनेत्रा पवार हाती घेतील राष्ट्रवादीची सूत्रे?

अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एक प्रवाह सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची मागणी करत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्षपद येण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांच्या नावाला जास्त पसंती राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि समर्थकांकडून दिली जात आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कोण सांभाळणार उपमुख्यमंत्रिपदाची धुरा? प्रफुल्ल पटेल अन् छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Web Title: News of my selection is baseless there is no truth to it says praful patel on ncp president issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • NCP Politics
  • NCP President
  • praful patel

संबंधित बातम्या

NCP Politics : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य
1

NCP Politics : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
2

Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

Narhari Zirval Viral Video:  मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल: Watch Video
3

Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल: Watch Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.