Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाड यांचे ‘ते’ विधान चर्चेत

गायकवाड यांच्या म्हणण्याचा हेतू शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हाच होता. आत्महत्या करण्याऐवजी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार-खासदारांपर्यंत पोहोचवाव्यात, असा त्यांचा आशय होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 12:25 PM
'त्या' शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाड यांचे 'ते' विधान चर्चेत

'त्या' शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी जाऊ नये; आमदार संजय गायकवाड यांचे 'ते' विधान चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • आमदार संजय गायकवाड यांचे शेतकरी आत्महत्यांवरील विधान चर्चेत.
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेला कोणीही जाऊ नये, असे वक्तव्य.
  • अंत्ययात्रेला कोणी गेले नाही तर शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि आत्महत्या थांबतील, असा दावा.
बुलढाणा : वादग्रस्त वक्तव्यांमुळे यापूर्वीही चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांवरील विधानामुळे चर्चेत आले आहेत. दुष्काळाच्या संकटाने आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असताना त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेला कोणी जाऊ नये, जेव्हा अंत्ययात्रेला कोणी जाणार नाही, तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि तो आत्महत्या करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत आहे. नापिकी, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक विवंचना यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. अशा संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींकडून जबाबदारीने वक्तव्य होणे अपेक्षित असताना, गायकवाड यांच्या विधानावरून चर्चा रंगली आहे. याचवेळी, शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा त्यांच्या अंत्यविधीला जाण्याच्या संदर्भात बोलताना, ‘त्या’ शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेला कोणी जाऊ नये, असे विधानही त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर बोलताना त्यांच्या तोंडून नेमके शब्द काय निघाले, यावरून चर्चा सुरू झाली आहे.

समस्या आमदार-खासदारांपर्यंत पोहोचवा

गायकवाड यांच्या म्हणण्याचा हेतू शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, हाच होता. आत्महत्या करण्याऐवजी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार-खासदारांपर्यंत पोहोचवाव्यात, असा त्यांचा आशय होता. मात्र, हा मुद्दा मांडताना बोलण्याच्या ओघात त्यांची जीभ घसरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावर लोकप्रतिनिधींनी शब्दांचे भान राखून भूमिका मांडणे महत्त्वाचे ठरते.

FAQ

१. आमदार संजय गायकवाड यांचे कोणते विधान चर्चेत आले आहे?
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेला कोणीही जाऊ नये, असे विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

२. त्यांनी असे विधान कोणत्या संदर्भात केले?
दुष्काळ आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.

३. शेतकरी आत्महत्यांबाबत त्यांनी काय भूमिका मांडली?
अंत्ययात्रेला कोणी जाणार नाही, तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि तो आत्महत्या करणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Web Title: No one should even attend the funeral processions of those farmers says mla sanjay gaikwad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • political news
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार; राज्यसभेवर जाण्याचा मार्ग अखेर मोकळा
1

हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार; राज्यसभेवर जाण्याचा मार्ग अखेर मोकळा

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली
2

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत
3

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’
4

जंगलतोडीवर खासदार संजय राऊत आक्रमक; म्हणाले, ‘…असे कृत्य राक्षसच करू शकतो’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.