Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संविधान सन्मान संमेलनात ओबीसी संघटनांची उपेक्षा; काँग्रेसवर रोष

संविधान सन्मान संमेलन ओबीसी हितासाठी नव्हे, तर लाल पुस्तकासाठी? असा आरोप आता भाजपने केलाय. ओबीसी संघटनांचे संविधान संमेलनाकडे दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसवर राजकीय आरोप करण्यात आला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 09, 2024 | 08:07 AM
संविधान सन्मान संमेलनात विदर्भातील ओबीसी समाजाच्या प्रमुख संघटनांनी स्वतःची उपेक्षा झाल्याचा आरोप केला

संविधान सन्मान संमेलनात विदर्भातील ओबीसी समाजाच्या प्रमुख संघटनांनी स्वतःची उपेक्षा झाल्याचा आरोप केला

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित संविधान सन्मान संमेलनात विदर्भातील ओबीसी समाजाच्या प्रमुख संघटनांनी स्वतःची उपेक्षा झाल्याचा आरोप केला आहे. या संघटनांनी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले, तसेच त्यांना व्यासपीठावर स्थान न दिल्याने त्यांचा रोष उफाळून आला आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

भाजपची कार्यक्रमार टीका

भाजपाने या कार्यक्रमावर टीका करताना म्हटले की, “काँग्रेसचा हा कार्यक्रम संविधानाचा सन्मान करण्यासाठी नसून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित केला गेला आहे.” महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संमेलनाचे संचालन केले, पण अन्य प्रमुख ओबीसी नेत्यांना डावलण्यात आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. काही ओबीसी संघटनांनी निमंत्रण मिळाल्यानंतरही संमेलनावर बहिष्कार टाकला, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.

हेदेखील वाचा – ऐन निवडणुकीच्या रिंगणात शिंदे गटाला मोठा धक्का! उरण विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

अपेक्षित प्रतिसाद नाही

कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे उपस्थितांच्या चर्चेतून समोर आले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरून ‘लाल पुस्तिका’ दाखवली. परंतु, या प्रतिकात्मक कृतीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी चर्चा आहे. या कारणावरून राहुल गांधी यांनी आयोजकांची कानउघडणी केल्याचेही बोलले जात आहे.

घोषणांवरही करण्यात आली टीका

या कार्यक्रमात महिलांसाठी दिलेल्या घोषणांवरही टीका करण्यात आली. महिलांना बोलण्याची संधी न मिळाल्याने महिला कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरला. काही महिला कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले, मात्र त्यांना न बोलताच खाली बसवण्यात आले. “महिलांवर अन्याय करून फक्त घोषणांवर भर देण्याचा हा कुठला न्याय?” असा सवाल महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनीही या कार्यक्रमाला अलिप्त राहणे पसंत केले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चाही रंगली. भाजपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “कालचा संविधान सन्मान संमेलन हा ओबीसी समाजाच्या हितासाठी नव्हता, तर लाल पुस्तकाच्या प्रचारासाठी होता.”

हेदेखील वाचा – Navi Mumbai: नरेश मस्केंच्या उपस्थितीत होणार तातडीची बैठक; काय असेल शिंदेगटाची रणनीती ?

निवडणुकांचे रणशिंग 

सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत. त्याच पाश्वभूमीवर जनतेकडून आपल्या पक्षाला आणि आपल्याला कसा फायदा मिळेल याकडे सर्वच उमेदवारांचे आणि पक्षाचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर वाद चालू असून प्रत्येकजण आपले पारडे कसे जड राहील याकडेच लक्ष देत आहे आणि यामुळेच राहुल गांधीवरदेखील टीका होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Obc organizations ignored in constitution respect conference boycott of congress meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 08:07 AM

Topics:  

  • Nagpur News
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
2

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक
4

सीसीटीव्ही देणे हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे? आयोगाच्या पत्रकार परिषदेवर विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.