ऐन निवडणुकीच्या रिंगणात शिंदे गटाला मोठा धक्का! उरण विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
रायगड /किरण बाथम :-उरण विधानसभा मतदारसंघात प्रथम शाखा स्थापन करणाऱ्या उलवे व इतर मतदारसंघातील पदाधिकारी यांनी एकत्रितपणे पत्रकारांच्यासमोर राजिनामे दिले आहेत. नोव्हेंबर2022 रोजी. उलवे नोडमध्ये त्या वेळचे जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात उलवे येथील एका आयोजित कार्यक्रमात त्यावेळचे शिवसेना संघटक कृष्णा पाटील, यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली दहा शाखाप्रमुख चार विभाग प्रमुख व एका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यानंतर अवघ्या दोन महिन्यातच महेंद्र थोरवेंवर कुरघोडी करून युवा सेनेचे कथित पदाधिकारी रुपेश पाटील यांनी जिल्हा प्रमुखांच्या मदतीने या सर्व शाखा व पदाधिकाऱ्यांना डावललं. तरी संयमाने येथील सर्व शिवसैनिक पक्षाचे काम करीत होते,असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावेळी निवडणुकीत या डावलल्या गेलेल्या कार्यकर्त्यांना काही दिवसा करता त्यांची पद कार्यान्वित करण्यात आली होती. खासदार बारणे यांची विजयी निवड झाल्यानंतर पुन्हा या संघटनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. असा गंभीर आरोप उरण मतदार संघातील शिवसैनिकांनी केला आहे.
शिंदे गटातील नाराज असलेले पदाधिकारी पुढे असंही म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडकी बहीण योजने’चे काम जोरात सुरू आहे. ठाणे येथील त्यांच्या युवा सेना कार्यालयात बसून उलवे नवी मुंबईमध्ये ते मात्र लाडकी वहिनी योजना राबवत आहे. मुख्यमंत्री शिंदे दादा वहिनींवर पदांची बरसात करीत आहे. अशी टीका देखील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उरणमधील शिंदे गटात होत असलेला हा मनमानी कारभार आम्हा पदाधिकाऱ्यांना सहन झाला नाही.वरिष्ठ स्तरावर याची दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी शिवसैनिकात प्रचंड नाराजी झाल्यानंतर आज त्याचा उद्रेक झाला. अशी खंत शिंदे गाटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी पत्रकारांसमोर आपआपल्या पदांचे राजीनामे सुपुर्द केले. युवा सेना नेते शिवसेनेला बदनाम करणाऱ्या अनेक गोष्टी उरण विधानसभा मतदारसंघात सातत्याने करत आहेत. माननीय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतानाही उरण मतदार संघात शहर किंवा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत एक टक्के हे पोहोचू शकले नाहीत. याची खंत यावेळी शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटावर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत होत मनमानी कारभाराला समोर आणले आहे.
हेही वाचा-Eknath Shinde : ‘उद्धव ठाकरेंची मशाल घराघरात आग लावणारी’; धाराशिवच्या सभेत एकनाथ शिंदेंचा घणाघात
राजीनामा देणारे पदाधिकारी पुढीलप्रमाणे
कृष्णा बा. पाटील. राजन म्हात्रे (संपर्क प्रमुख उलवे),
भरत देशमुख ( उलवे शहर प्रमुख),
अमित कमळाकर ठाकूर (उपतालुका प्रमुख उरण तालूका)
प्रभाकर पाटील – (विभागीय प्रमुख गव्हाण,उलवे),
विजय पाटील.(विभाग प्रमुख चिरनेर),
सचिन पाटील. (समन्वयक उरण तालुका.)
अनंता गडकरी( शाखा प्रमुख बामण डोंगरी),
संतोष मोकल, (शाखा प्रमुख तरघर),
सचिन देशमुख) शाखा प्रमुख खारकोपर),
ज्ञानेश्वर पाटील (शाखा प्रमुख मोरावे)
रामदास पाटील. (संघटक वहाळ ग्रामपंचायत),
धनंजय कोळी( मोहा शाखा प्रमुख.),
अतिष ठाकूर. (शाखा प्रमुख उलवे सेक्टर 19), प्रसाद पाटील. – (शाखा प्रमुख उलवे सेक्टर ५/६ उलवे.),
सुरेंद्र ठाकूर – (जसखार शाखा प्रमुख) या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांच्यासमोर पदाचे राजीनामा जाहीर केले आहेत.
अद्याप या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षात काही नेत्यांकडून होणाऱ्या मनमानी कारभारावर शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.