Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरुन खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू – मिलिंद देवरा

शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत उबाठा गटातील खासदारांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचा दावा केला. विकासकामांसाठी शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 07:55 PM
Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरील खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू - मिलिंद देवरा

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरील खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू - मिलिंद देवरा

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांची टीका
  • संजय राऊत वैफल्यग्रस्त, त्यांच्यावर संस्कार नसल्याने ते खासदारांना शिव्या देतात – मिलिंद देवरा
  • लोक पक्ष सोडून का जात आहेत, याबाबत उबाठाने आत्मपरिक्षण केले पाहिजे – मिलिंद देवरा
 

Operation Tiger : “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास उडाला असल्यानेच ते आज दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिले,” अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. बाळासाहेब भवन येथे पत्रकारांशी खासदार देवरा यांनी संवाद साधला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षपुटी झाली असून शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

काय म्हणाले मिलिंद देवरा ?

खासदार देवरा म्हणाले की, “उबाठाकडून पक्षाध्येश जारी करुन देखील आज दिल्लीतील बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिले, याचे कारण उद्धव ठाकरेच सांगू शकतात. पण खासदार उबाठा पक्षात नाराज आहेत आणि त्यांचा आता उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिलेला नाही, असे खासदार देवरा म्हणाले. महाराष्ट्रातील जनता आणि लोकप्रतिनिधींचा एकनाथ शिंदेंवर विश्वास वाढत आहे. त्यामुळे राज्यभरातून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ज्यांना शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहेत ते शिवसेनेचे हात मजबूत करत आहेत, असे खासदार म्हणाले. लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना मतदार संघात विकास कामे करायची आहेत. आम्ही कोणाला फोडत नसून जोडण्याचे काम करत आहोत, असे खासदार देवरा म्हणाले. शिवसेनेत येणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करु,” असे ते म्हणाले.

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर

खासदार देवरा म्हणाले की, “पक्षाची बैठक आणि त्यासंबधी नियम काय, व्हीप केव्हा जारी केला जातो, याबाबत उबाठा खासदारांनी माहिती घ्यायला हवी. संसदेत होणाऱ्या मतदानापुरता व्हीप जारी केला जातो. पक्षाच्या कोणत्याही बैठकीसाठी व्हीप जारी केला जात नाही. उबाठाचे खासदार इतकी वर्ष संसदेत आहेत, मात्र त्यांना नियमावली माहिती नाही,” याबाबत खासदार देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले.

संजय राऊत वैफल्यग्रस्त

“संजय राऊत यांच्यावर संस्कार नसल्याने ते खासदारांना शिव्या देतात. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. कधी राऊत दावा करतात की खासदार त्यांच्या सोबत आहेत तर कधी खासदारांवर पैसे घेतल्याचे आरोप करतात. राऊत यांच्या बोलण्यातला विरोधाभास म्हणजे त्यांचे संतुलन बिघडल्याचे दर्शवतो, अशी टीका खासदार देवरा यांनी केली. राऊतांकडून वारंवार होणाऱ्या अपमानामुळे त्यांच्या पक्षात कोणी थांबण्यास तयार नाही, असे देवरा म्हणाले. लोक पक्ष सोडून का जात आहेत, याबाबत उबाठाने आत्मपरिक्षण केले पाहिजे,” असा सल्ला खासदार देवरा यांनी दिला.

शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा! शिंदेंच्या ‘त्या’ शब्दांचा नेमका रोख कोणाकडे?

Web Title: Operation tiger milind deora on uddhav thackeray mps shiv sena entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • Milind Deora
  • Operation Tiger
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘…नाहीतर चिन्ह गोठेल’; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
1

‘…नाहीतर चिन्ह गोठेल’; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Shivsena Bow And Arrow Hearing: …तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक
2

Shivsena Bow And Arrow Hearing: …तर शिंदे मुख्यमंत्री झालेच नसते!; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटासाठी आक्रमक

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?
3

Uddhav Thackeray हाजीर हो! 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे समन्स,नेमकं प्रकरण काय?

Aditya Thackeray News: शांततापूर्ण आंदोलकांवर AK-47 अन् पेलट गन्स!; विद्यार्थ्यांच्या मारहाणीवरून आदित्य ठाकरेंचा केंद्राला इशारा
4

Aditya Thackeray News: शांततापूर्ण आंदोलकांवर AK-47 अन् पेलट गन्स!; विद्यार्थ्यांच्या मारहाणीवरून आदित्य ठाकरेंचा केंद्राला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.