शिवसेनेच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा! शिंदेंच्या 'त्या' शब्दांचा नेमका रोख कोणाकडे? (Photo Credit- X)
खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे पोस्टर समोर आले असून त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरवर “जनात शिवसेना, मनात शिवसेना” असा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचा डरकाळी फोडणारा सिंह, पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे झळकवण्यात आली आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाषण करतानाचा फोटोही पोस्टरमध्ये दिसत आहे.
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन! ‘जनात शिवसेना, मनात शिवसेना’ तुमच्या – आमच्या प्रत्येकाच्या नसांनसात भिनलेला विचार म्हणजे, ‘शिवसेना’!
येत्या १९ जून रोजी ‘शिवसेना’ या विचाराला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब… pic.twitter.com/KwnMsog5Yy — Murji Patel (@MurjiPatel_) June 18, 2026
शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खासदारांच्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका मांडणार आणि आगामी राजकीय रणनीतीबाबत काय घोषणा करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
खासदार आणि आमदारांनंतर आता ठाकरे गटातील नगरसेवकांमध्येही प्रचंड अस्वस्थता असून, आगामी काळात पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा युवासेना नेते अमेय घोले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे २० ते २५ नगरसेवक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, असे सांगत घोलेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
माध्यमांशी बोलताना अमेय घोले यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “ठाकरे गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटण्यासाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच मुख्य कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे.”
‘संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर…’ राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया






