Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger: संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्यानंतर बंडखोर खासदारांना Y+ सुरक्षा; गृह विभागाचा मोठा निर्णय

ऑपरेशन टायगरनंतर बंडखोर ठरलेल्या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन तुडवा’ इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 08:59 PM
जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

जयंत पाटील-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे ‘ऑपरेशन तुडवा’
  • संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर बंडखोर खासदारांना ‘Y प्लस‘ सुरक्षा
  • राज्य सरकारच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांचे अधिकृत पत्र जारी
 

Operation Tiger : शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षपुटी झाली आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून या खासदारांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ‘Y+’ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन तुडवा‘ म्हणत दिलेल्या इशाऱ्यानंतर गृह विभागाकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी काल (बुधवार, 17 जून) यांनी एक अधिकृत पत्र जारी केले असून राज्यातील तणावाच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या खासदारांना मिळणार Y+ सुरक्षा

संजय देशमुख , यवतमाळ

संजय जाधव, परभणी

संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई

नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली

ओमराजे निंबाळकर, धाराशिव

भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

Operation Tiger : ‘उद्धव ठाकरेंवरुन खासदारांचा विश्वास उडाला’; शिवसेनेत येणाऱ्यांचे स्वागत करू – मिलिंद देवरा

संजय राऊतांचा ‘ऑपरेशन तुडवा’चा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत टीका करत आता ‘ऑपरेशन तुडवा’ राबविण्याचा इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, “तुम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि जनतेच्या विश्वासावर निवडून आला आहात. जर तुमच्यात खरोखरच हिंमत असेल, तर खासदारकीचा तात्काळ राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा.”

डरपोक (गांडू) !
ऑपरेशन “तुडवा ” इफ़ेक्ट
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DDWBdkHIVu
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2026

‘गद्दारांविरोधात लढा सुरू होणार’

बंडखोर खासदारांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षातच काही लोकांनी पक्षाशी बेईमानी केली आहे. “आम्ही आता गद्दारांविरोधात ऑपरेशन तुडवा सुरू करत आहोत. तुम्ही तुमची फौज घेऊन या, आम्ही आमची फौज घेऊन येतो,” असे आव्हान त्यांनी दिले.

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर

Web Title: Operation tiger y plus security for rebel shiv sena mps after sanjay raut operation tudva warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:59 PM

Topics:  

  • Operation Tiger
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
2

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.